Home ताज्या बातम्या ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकांनी गाजवले १०० वे नाट्य संमेलन

ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकांनी गाजवले १०० वे नाट्य संमेलन

106
0

पिंपरी,दि. ८ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुस-या दिवशीही पिंपरी चिंचवड शहरातील विविध नाट्यगृहात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटकांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.
‘घाशीराम कोतवाल’ या मराठीतील मैलाचा दगड असलेल्या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग नाट्य संमेलनात सादर करण्यात आला. विजय तेंडूलकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांनी केले होते. देशासह विदेशातही या नाटकाने आपला अमिट ठसा उमटवलेला आहे. आज डाॅ. पटेल अध्यक्ष झाल्याने पांडव निर्मित या नाटकाचा खास प्रयोग नाट्य संमेलनात ठेवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांनाही उदंड प्रतिसाद दिला.
नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात ‘चाणक्य’ या नाटकाचा प्रयोग रंगला. हिंदी रंगभूमीवर ‘चाणक्य’ हे नाटक खूप गाजलं आहे. या वेगळ्या धाटणीच्या नाटकाचा अनुभव मराठी नाट्यरसिकांनाही मिळावा म्हणून मागील वर्षी ‘चाणक्य’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणण्यात आले. या नाटकाचा खास प्रयोग १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात  ठेवण्यात आला. अभिनेते शैलेश दातार चाणक्यच्या मुख्य भूमिकेत आहेत.तर दिग्दर्शन प्रणव जोशी यांनी केले आहे. या नाटकाचे मूळ लेखक मिहिर भुता असून, त्याचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे.
मध्यप्रदेशातील प्रायोगिक नाटक ‘रा+धा’ चा प्रयोग रंगला. रविंद्र लाखेंच्या कथेचे नाट्यरुपांतरण दिग्दर्शन श्रीराम जोग यांनी केले आहे. या नाटकात जीवन आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे तत्त्वज्ञान भावनांच्या आधारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रा+धा आणि घनश्यामच्या रंगमंचावरच्या उपस्थितीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदि उपस्थित होते.

Previous articleलावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिकेने नाट्य संमेलन गाजले
Next articleअवधूत गुप्तेच्या संगीत रजनीला तूफान प्रतिसाद शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची दमदार सांगता 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + eleven =