Home ताज्या बातम्या १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनतं- तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका, त्याचा...

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनतं- तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका, त्याचा फायदा करून घ्या : परिसंवादात उमटला सुर

92
0

पिंपरी, दि. ७ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युजप्रतिनिधी):- ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’ हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजन्स – एआय) पेक्षा भावनिक नातेसंबंध (इमोशनल इंटेलीजन्स) महत्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घ्या.
ए. आय. चे गुलाम होऊ नका, त्याचा फायदा करून घ्यावा. त्याचा आपल्या लेखनासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे लेखकांनी समजून घ्यावे. त्यामुळे ‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’चे धोके जरी असले तरी ते समजून घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा, असा सूर रविवारी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात उमटला.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात रविवारी ”ऑनलाईन एन्टरटेन्मेंट” आणि ‘चॅट जीपीटी’ चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादात अभिनेते सुनील बर्वे, ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर सहभागी झाले होते, त्यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी संवाद साधला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादात बोलताना नाटककार विजय केंकरे म्हणाले, ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’ मुळे क्षणिक काळाचे नाटकार, लेखक तयार होतील अशी भीती आहे. कोरोना काळात चॅट जीपीटी किंवा ए. आय. चा उपयोग झाला असला तरी आता असे लेखक फार काळ टिकणार नाही. कारण हे तंत्रज्ञान ढोबळ स्वरूपाचे आहे. लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही. शिवाय रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात चॅट जीपीटी किंवा ए. आय. ते लिहू शकत नाही. असे प्रयोग झाले तरी ते टिकणार नाहीत. नाटक आणि सिनेमा ही टिकाऊ गोष्ट आहे ही जाणीव लेखकाला असेल तर चॅट जीपीटी किंवा ए. आय. हा धोका होऊ शकत नाही.
सुनील बर्वे म्हणाले, कोरोना काळात आम्ही कलाकारांनी मिळून ऑनलाईन ड्रामा कॉम्पिटिशन सुरू केली होती. कलाकार निराशेच्या गर्तर्तेत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही घेतली होती. पण कोरोना नंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. ऑनलाईन हे माध्यम मर्यादीत आहे. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्व आहे.
लेखक नीरज शिरवईकर म्हणाले, चॅट जीपीटी किंवा ए. आय.चा वापर मी केलेला आहे. ते एक साचेबद्ध माध्यम आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्याव्या. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे कळालं तर लेखकांना यांची मदतच होईल.

Previous articleअ. भा. नाट्य संमेलना व्यतिरिक्त सुद्धा बाल नाट्य नगरी झाली पाहिजे – अभिनेत्री निलम शिर्के-सामंत
Next article.. अन् नाट्य संमेलनात रंगली काव्य पहाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =