रावेत,दि.२७ नोव्हेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत किवळे येथील घोरावडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ व स्वर्गीय बाजीराव बाबुराव भोंडवे पाटील विरंगुळा केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा(ता.२६ नोव्हेंबर) बाजीराव पार्क,गणेश नगर,एमआयडीसी रोड रावेत येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी सत्यनारायण महापुजा घेण्यात आली.माऊली महिला भजनी मंडळ, बापदेव नगर आणि सरस्वती महिला भजनी मंडळ, रावेत यांनी भजनी कार्यक्रम सादर केले.
या विरंगुळा केंद्रात शिंदे वस्ती, शांताई कॉर्नर, चंद्रभागा कॉर्नर,आदर्श नगर,बापदेव नगर, येथील सर्व ज्येष्ठ नागरिक ह्या विरंगुळ केंद्रात असतात ह्या विरंगुळा केंद्रात माजी सैनिक, शिक्षक,सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, घोडेश्वर युवा मंच व घोरावडेश्वर महिला मंडळ सहभागी असून या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करतात वाढत्या शहरीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी वयोवृद्ध लोकांना बसण्या उठण्याची जागा नसते त्यामुळे ह्या त्यांना जास्त प्रमाणात होतो अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये संवाद होतात एकमेकांच्या सुख दुःख तसेच दिवसभराचा विरंगुळा एकमेकांच्या सानिध्यात येऊन हे ज्येष्ठ नागरिक पार पाडतात त्यांच्या जुन्या आठवणी असतील किंवा शहरातील चालू घडामोडी असतील अशा प्रकारचे विविध विषय ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये होत असतात कुठेतरी त्यांना एकांत वासातून दुर नेण्याचा हा विरंगुळा केंद्राचा एक प्रयत्न असतो.अशी माहिती आयोजक युवा नेते दिपक मधुकर भोंडवे यांनी प्रजेचा विकासशी बोलताना दिली.
या मंगलमय प्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्री श्रीरंग आप्पा बारणे( खासदार मावळ लोकसभा), श्रीमती. अश्विनीताई जगताप( चिंचवड विधानसभा), शंकर भाऊ जगताप( शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी चिंचवड),यावेळी संजोग वाघिरे पाटील ( माजी महापौर,पि.चि.मनपा), राहुल कलाटे( मा:नगरसेवक पिं. चि मनपा), संदीप वाघिरे पाटील(मा:नगरसेवक,पिं. चि मनपा), नामदेव ढाके( गटनेते, पिं.चि मनपा),बाळासाहेब वाल्हेकर (शिवसेना जिल्हाप्रमुख),संगीताताई भोंडवे (मा.नगरसेविका, , पिं.चि मनपा),बाळासाहेब ओव्हाळ (मा:नगरसेवक,पिं.चि मनपा),सचिन साठे (युवा नेते),डॉ.अमरनाथ वाघमोडे( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत),श्रीमती वृषालीताई मरळ( अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिं.चि), संतसेवक मुकुंदनाना तापकीर,अंकुश बोडके( सामाजिक कार्यकर्ते),संतोष साठे पाटील( उद्योजक), नितीनदादा घोटकुळे (युवा नेते भाजपा), निकिता ताई घोटकुळे( सभापती, पंचायत समिती, मावळ), राहुल फडके( पोलीस पाटील,निघोजे),नीतीराज गाडे( उद्योजक), संदेश तापकीर (सामाजिक कार्यकर्ते), वैभव संदेश तापकीर,मधुकर नथू भोंडवे (संचालक संत तुकाराम साखर कारखाना, कासरसाई), प्रकाशजी भोंडवे, दिवाणजी भोंडवे( मा. पोलीस पाटील,रावेत), नंदकुमार भोंडवे, तानाजी भोंडवे, सुनील आप्पा भोंडवे, पोपटशेठ भोंडवे,सोमनाथ भोंडवे( अध्यक्ष,रावेत- कालेवाडी मंडल,भाजपा),वसंत काळभोर, संतोष अप्पा भोंडवे, सतीश अप्पा भोंडवे,निलेश तरस( शहराध्यक्ष पिं. चि, शिवसेना),संस्थापक- सुरेश बाजीराव भोंडवे पाटील,अध्यक्ष: श्री भीमराव निकम,सचिव: श्री खंडू पवार,खजिनदार: श्री बाळू शेंडे सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू शेंडे सर व शाहू कदेरे यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होते.