Home ठाणे महिलांसाठी हा गौरवाचा सण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षरानं लिहीला जाणार आहे :...

महिलांसाठी हा गौरवाचा सण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षरानं लिहीला जाणार आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

211
0

ठाणे,दि.२२ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देणारे ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ बहुमताने मंजूर करण्यात आले. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी या निर्णयाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या महिला आघाडीने याबद्दल गणपती बाप्पाची विशेष आरती करून देवाचे आभार मानले.

या आरतीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या 100 महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या साथीने गणपती बाप्पाची आरती करून हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल देवाचे आभार मानण्यात आले. तसेच त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानून त्याना यश आणि उत्तम दीर्घायुष्य मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांची सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटीका सौ. मीनाक्षी शिंदे तसेच शिवसेनेच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शंभरहुन अधिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर
महिलांसाठी गौरवाचा क्षण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाचे स्वागत

महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णय क्षमतेमुळे हा निर्णय होऊ शकला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करतो.

आमच्या शासनाने ही प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रेरणेतून नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

Previous articleप्रजेचा विकास चा दणका…अखेर माय कार शोरूम च्या सीईओ सहित दोन महिलांवर गुन्हा दाखल ; शोरूम आहे की कुंटणखाना…?
Next articleपिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 17 =