Home ठाणे अल्पसंख्याक समाजातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा नुकताच मुंबई येथे संवाद मेळवा पार पडला

अल्पसंख्याक समाजातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा नुकताच मुंबई येथे संवाद मेळवा पार पडला

170
0

मंबई,दि.१५ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत नुकतेच राज्यभरातील अल्पसंख्याक समाजातील नगरसेवक, नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या सर्वांसमवेत नुकताच मुंबई येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ नेते जलील पटेल, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष जावेद राज यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख सईद खान यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अल्पसंख्याक समाजातील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न याबाबत संवाद साधला. यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चाही घडून आली. याच बरोबर सर्वांचे प्रश्न तसेच विकासकामे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वेळीच मार्गी लावले जातील, असे आश्वासनही यावेळी उपस्थितांना दिले.

Previous articleशिवमहापुराण कथा- सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर मोफत अध्यात्मिक कार्यक्रम
Next articleमित्राचा खुन करणारा आरोपी जेरबंद रावेत पोलिसांची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 13 =