Home जालना मराठा मोर्चा – ९ सप्टेंबर शनिवारच्या बंदला शेकडो संघटनांचा पाठिंबा

मराठा मोर्चा – ९ सप्टेंबर शनिवारच्या बंदला शेकडो संघटनांचा पाठिंबा

149
0

पिंपरी,दि.०८ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 10 वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे मेन बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक यांची निषेध सभा होवून महामोर्चाचे सांगता होणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या जालना येथील मनोज जरांडे पाटील हे उपोषणाला बसले असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा लोक आंदोलन स्थळी उपस्थित होते. मराठा आरक्षण या विषयावर सरकारकडून होणारी चालढकल दर दोन वर्षांनी नवीन नवीन आयोगाची नेमणूक करणे,नवीन नवीन आरक्षण समितीची स्थापना करणे,आणि मराठा समाजाला आरक्षण या विषयावर झुलवत ठेवणे. या सरकारच्या वेळ काढू धोरणाच्या निषेधार्थ मनोज जरांडे पाटील यांनी आमरण उपोषण हे आंदोलनाच हत्यार उपसले असताना,आंदोलन थांबले पाहिजे,आंदोलनात असलेले आंदोलक मराठा बांधव हे मॅनेज करण्याचा सरकारकडून प्रचंड प्रयत्न झाला, पण एकही मराठा बांधव सरकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडला नाहि.एकाही आंदोलकाने माघार घेतली नाही.म्हणून चिडलेल्या सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी आंदोलन प्रसंगी पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यात शेकडो लोक जखमी झाले, लहान मुलांना सुद्धा पोलिसांनी सोडले नाहीत. त्यांच्यावरील लाठी चार्ज करण्यात आला,अश्रूधरांच्या नळकांड्या फोडल्या हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून पोलिसांच्या माध्यमातून लाठी हल्ला करण्यात आला. या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर आयोजित पिंपरी चिंचवड शहर बंदला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शहरातील 18 पगड बारा बलुतेदार एकटवला आहे.अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,जिजाऊ ब्रिगेड,मराठा महासंघ, मराठा छावा युवा संघटना,काँग्रेस पक्ष,शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,राष्ट्रीय समाज पक्ष,स्वराज्य संघटना,प्रहार जनशक्ती पक्ष,मराठा महासंघ,श्री जगद्गुरू प्रतिष्ठान,अखिल भारतीय छावा,अखिल भारतीय मराठा महासंघ,जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य अभियान,राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरी संघ,अपणा वतन संघटना,जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, छावा युवा मराठा महासंघ,आम आदमी पार्टी,एम आय एम,भिमशाही युवा संघटना,राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी,भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती,फुले शाहू आंबेडकर विचार मंच, मराठा जोडो अभियान,वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया,राष्ट्रीय इसाई महासंघ,दलित पँथर सेना,बौद्ध जनसंघ,शिवशाही संघटना, शिवप्रेमी जनजागरण समिती, मराठा महासभा,यासह अनेक सामाज संघटना,कामगार संघटना,व्यापारी संघटना व मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने पाठींबा दर्शवला.एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. या जयघोषाखाली शेकडो संघटना सहभागी होऊन पिंपरी चिंचवड शहर बंदला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्रकाश जाधव,कैलास कदम,सचिन चिखले,मारुती भापकर,जीवन बोराडे, सतिश काळे,धनाजी येळकर पाटील,मनोज मोरे,सचिन भोसले,प्रवीण कदम,लहू लांडगे, अभिषेक म्हसे,नकुल भोईर,वैभव जाधव यांनी दिली आहे.

Previous articleमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड शहर बंद
Next articleपिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधवांचा उपोषणास बसुन मोर्चाला पाठिंबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four − one =