Home ताज्या बातम्या गद्दारांना पेटवण्यासाठी शिवसेनेची मशाल सज्ज – ॲड. सचिन भोसले

गद्दारांना पेटवण्यासाठी शिवसेनेची मशाल सज्ज – ॲड. सचिन भोसले

193
0


पिंपरी,दि. ४ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनाधी):- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज प्रतिनिधी जालन्यामध्ये शांततेने उपोषण करीत असताना राज्य सरकार मधील ‘अनाजी पंतांच्या आदेशाने’ पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज करीत हवेत गोळीबार केला. या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा च्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहे. तसेच या घटनेबाबत राज्य सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा राज्य सरकारमधील ‘अनाजी पंतांना’ आणि गद्दारांना पेटविण्यासाठी शिवसेनेची मशाल सज्ज असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड .सचिन भोसले यांनी सांगितले.
जालना जिल्हा येथील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करीत हवेत गोळीबार केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. ३ सप्टेंबर ) पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आंदोलन करण्यात आले.


यावेळी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका अनिता तूतारे, माजी नगरसेवक संजय दुर्गुळे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, तुषार नवले, माजी शहर प्रमुख योगेश बाबर तसेच युवराज कोकाटे, शैलेश मोरे, रोमी संधू, राजू सोलापुरे, पांडुरंग पाटील, मोहन बारटक्के, शिवा कुऱ्हाळकर, विलास चिंचवडे, नाथाभाऊ खांडेवार, हरेश नखाते नितीन कोंडे, अमोल निकम, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, गुलाब गरुड, गोपाळ मोरे, विनोद जाधव, महेंद्र तांबे, अमोल निकम, संतोष नानक, कैलास तोडकर, शंकर कुराळकर, ऋषिकेश जाधव, विठ्ठल कळसे, परशुराम जाधव, विजय चव्हाण, शरद जगदाळे, विकास भिसे, गंगाराम काळे, अरुण पात्रे ,प्रीतम तेलंग, गजानन धावडे, बेबी सय्यद, राजाराम तु,पे नाथाभाऊ खांडेभराड, गोरख पाटील, नरसिंग माने, नितीन बोंडे, भरत इंगळे, विजय साने, दीपक ढोरे, सागर शिंदे, अमित निंबाळकर, संतोष सौंदनकर, दिनेश पात्रे, अरुण पात्रे, सर्जेराव कचरे, दिलीप भोंडे, अमोल निकम, संदीप भालके, संतोष म्हात्रे, राम उतेकर, चेतन शिंदे, गंगाधर काळे, चंद्रकांत शिंदे, सहदेव चव्हाण, आकाश हेळवार, समीर हळदे, तुकाराम भोसले, मज्जिद शेख, कुदरत खान, किशोर सातपुते, महेश शेतसंधी, संभाजी मासुळकर, भरत इंगळे, योगेश राऊत, सावताराम महापुरे, सुनील भाटे, प्रदीप चव्हाण, कय्युम पठाण, भोलाराम पाटील, पुरुषोत्तम वायकर, श्रीकांत चौधरी, दत्ताराम साळवी, गौतम लहाने, विजय ढोबळे, परवेश शेठ, नरेंद्र मराठे, सागर कांबळे, शंकरराव देसले, आकाश आयवळे, विशाल साळवी, गोरख नवघणे, राम उत्तेकर, गंगाधर काळे, सर्जेराव कचरे, कल्पना शेठ, वैशाली कुलथे, रूपाली अल्हाट, साधना काशीद, रजनी वाघ, नंदा दातकर, उषा आल्हाट, कामिनी मिश्रा, पूनम री, अमृता सुपेकर, संगीता सोनवणे, ज्योती वायकर, प्रतीक्षा दमयंती गायकवाड, संगीता तुटके आदी उपस्थित होते.

Previous article‘धन्वंतरी’ योजनेत महापालिका प्राथमिक शिक्षकांचाही समावेश करा!
Next articleबातमीचा दणका- कार्यशाळा प्रमुख “चिकुर्डे” चीं तडकाफडकी बदली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × two =