देहुरोड,दि.१६ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):- मुंबई- बेंगलोर हायवे लगत विकासनगर किवळे येथे सर्विस रोडवर अनेक दिवसा पासुन होतंय सांडपाण्याच्या घाणीचे साम्राज्य संपूर्ण रोडवर सांड सांडपाणी साचले आहे.डी मार्ट ते शांती निवास – ओम पॅराडाईज लगत असणाऱ्या नाल्यापर्यंत, देहूरोड शिवाजी विद्यालय त्या साईडने वरुन येणारा चेंबर तुंबून त्याचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रोडवर येत आहे.त्यावरूनच नागरिकांची गाड्यांची ये जा करावी लागत असून या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे,अनेक वेळा टु व्हिलर या ठिकाणी स्लिप झाल्या आहेत.
प्रवासी पाई प्रवासी या सर्वांनाच याचा फटका बसत असून ही हद्द देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची असून त्याकडे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड दुर्लक्ष करत आहे. तोच नाला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बॉर्डर असल्याने त्याकडे हमेशाच या परिसरात दुर्लक्ष होत आहे.रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असेल किंवा रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य असेल या परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये सहभाग जरी घेतला,असला तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र अशा घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कोणतेही कारवाई केली जात नाही. प्लास्टिक मुक्त देहूरोड करण्याचा संकल्प कॅन्टोन्मेंट बोर्डाने केला मात्र सगळीकडे प्लास्टिकच्या पिशव्या रोडवर व रोडच्या कडेला पडलेल्या दिसत आहे. या सर्व गोष्टीमुळे सर्विस रोडच्या आजूबाजूला वाढलेली दाट झाडी त्यामुळे त्या ठिकाणी अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सांडपाण्यामुळे होणाऱ्या डासांची उत्पत्ती अशा अनेक गोष्टींना देहुरोड शहरातुन वाहतत येणाऱ्या नाल्याचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा प्रकार घडत आहे. याकडे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व पिंपरी चिंचवड महानगरपालिका लक्ष देणार का सध्या स्थितीत दोन्हीकडे प्रशासन राज आहे.त्यामुळे अधिकारी याकडे लक्ष देणार का ? की स्थानिक नागरिकांना यासाठी ही मोर्चा काढावा लागणार किंवा निवेदन द्यावे लागणार आहेत. अशा चर्चांना उधाण आला आहे.