Home ताज्या बातम्या पुणे जिल्हा बेकरी उत्पादक सहकारी संस्था यांची दक्षता बैठकिचं आयोजन

पुणे जिल्हा बेकरी उत्पादक सहकारी संस्था यांची दक्षता बैठकिचं आयोजन

199
0

कोंढवा,दि. ११ ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- कोंढवा पोलीस स्टेशन , हद्दीत भाग्योदय नगर जमातेसौलेहात मदरसा कोंढवा खुर्द या ठिकाणी पुणे जिल्हा बेकरी उत्पादक सहकारी संस्था यांची(दि.१०) बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीचे आयोजन ईदरीस जमाते उलेमा पुणे शहराध्यक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती

सदर मीटिंगमध्ये पोलीस स्टेशन तर्फे सुरू असणाऱ्या घरमालक, भाडेकरू कामगार यांची मोहिमेबद्दल असणाऱ्या अडीअडचणी व इतर समस्या यावरती चर्चा करण्यात आली. बेकरी मध्ये कामाला असणार्‍या लोकांची पोलीस वेरिफिकेशन करून घेणे तसेच त्यांचे कागदपत्रे अपडेट करून आपल्याजवळ व्यवस्थित ठेवणे बेकरीमध्ये अग्निशामक यंत्र बसवून घेणे लाईटची सोय किंवा इमर्जन्सी तसेच कामगारांची राहण्याची सोय व्यवस्थित आहे अगर कसे याबाबत पूर्ण खात्री करून घेणे. आपले असोसिएशन तर्फे जास्तीत जास्त बेकरी मालक यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती कशी गोळा करता येईल यावर उपाय योजना आखण्यात आली. प्रत्येक बेकरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेण्यात यावे तसेच कोणत्याही बेकरीमध्ये १८ वर्षाखालील कोणीही कामगार काम करणार नाही याची खात्री करून घ्यावी. सदर बैठकीत नागरिकांनी घरातील तसेच दुकानातील भाडेकरू करार व कामगार वेरिफिकेशन करणे गरजेचे आहे व ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. याबाबत मार्गदर्शन केले . तसेच सदर मोहिमेस संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर बैठकीत आम्ही स्वतः आदरपूर्वक सादर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस उपनिरीक्षक, वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, गोपनीय स्टाफ व २५ ते ३० बेकरी मालक-चालक असे उपस्थित होते. सदर बैठक शांततेत पार पडली.

Previous article“दिपक भोंडवे” यांना भारतरत्न जे. आर.डी. टाटा “युवा कृषी उद्योगभूषण” पुरस्कार प्रदान
Next articleपुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार – नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + thirteen =