Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहर पोलीसआयुक्त यांनी केलेल्या आवाहनाचे मनसे ने केले कौतुक

पिंपरी चिंचवड शहर पोलीसआयुक्त यांनी केलेल्या आवाहनाचे मनसे ने केले कौतुक

250
0

निगडी,दि.०९ ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):- पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपले शहर, सुरक्षित शहर अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील घर मालक, सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी तसेच नागरिकांना आवाहन केले आहे.

काय केले अहवान
१) भाडेकरार बंधनकारक
२) प्रत्येक घर मालकाने भाडेकरू ची माहिती पोलीस स्टेशन येथे वेळेत सादर – न केल्यास घर मालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
३) सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरू ना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच ते सर्वस्व जबाबदार राहतील.
४) ऑनलाईनद्वारे भाडेकरूचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस – स्टेशन येथे घर मालकाने देणे हे बंधनकारक असेल
५) कोणी हेवी डिपॉझिट मागत असेल तर आपण पोलीस स्टेशनला कळवावे. – त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

मनसे शहरध्यक्ष पि.चि -सचिन चिखले,  जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सर्व आवाहन अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल आणि शहर सुरक्षित राहील या केलेल्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे तसेच आम्ही देखील या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो

परंतु आपणास नम्र विनंती आहे की यासाठी आपण शहरातील सर्वसामान्य नागरिकांना एक ठराविक कालावधी देऊन सहकार्य करावे व त्यानंतर पडताळणी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी या साठी माननीय उपआयुक्त संजय शिंदेसाहेब यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सचिन चिखले (शहराध्यक्ष- पिं. चिं. शहर), विशाल मानकरी (उपशहराध्यक्ष- पिं. चिं. शहर), राजू सावळे (उपशहराध्यक्ष- पिं. चिं. शहर), चंद्रकांत(बाळा) दानवले (उपशहराध्यक्ष- पिं. चिं. शहर), दत्ता देवतरासे (अध्यक्ष – पिंपरी विधानसभा), मयूर चिंचवडे (अध्यक्ष – चिंचवड विधानसभा), सचिन शिंगाडे (शहराध्यक्ष – माथाडी कामगार सेना), नितिन चव्हाण (उपविभाग अध्यक्ष – पिंपरी विधानसभा), आकाश सागरे (शाखा अध्यक्ष) उपस्थित होते.

Previous articleपोलिस आयुक्त कार्यालयावर शंभर संघटनांचा महामोर्चा;संभाजी भिडे न वर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Next article“दिपक भोंडवे” यांना भारतरत्न जे. आर.डी. टाटा “युवा कृषी उद्योगभूषण” पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 1 =