Home ताज्या बातम्या शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढिसाठी बाहेर पडले,अजित पवार...

शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढिसाठी बाहेर पडले,अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची वाढणार डोके दुखीः

264
0

चिंचवड,दि.०६ ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण राष्ट्रवादीचा कार्यकारणी ही अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात बोटावर मोजणे इतके शरद पवारांचे कार्यकर्ते राहिले होते. मात्र पाच ऑगस्ट रोजी रावेत येथील हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना मानणारे कार्यकर्त्यांची समविचारी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सुमारे साडेतीनशे ते चारशे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली, त्यामुळे हा पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला एक मोठा धक्का मानला जात आहे युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख व तसेच विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे त्याचबरोबर जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात नेमलेले समन्वय यांनी पुढाकार घेत सर्व कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत अचानकपणे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलवत शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुरोगामी विचाराचे तसेच शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते तसेच शरद पवारांसोबत काम करणारे कार्यकर्ते आणि काही शरद पवारांच्या विचारांना मानणारे नवे कार्यकर्ते यांनी पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा त्याच ताकतीने त्याच जोमाने राष्ट्रवादी काम करेल असा विश्वास संपादित करत बैठक पार पाडली व बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचीच आहे आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही अजित दादा आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर गेल्यात त्यांचा गट आहे ते त्यांना भीती आहे म्हणूनच ते शरद पवार साहेबांचा फोटो लावू नका पवार साहेब बोलले असतानाही शरद पवार साहेबांचा फोटो लावून काम करत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरारी घेईल असा विश्वास सर्वांना आहे आणि आम्ही ते करू अशी माहिती माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवे कार्यालय लवकरच त्याचे उद्घाटन होईल कारण जुने कार्यालयाचे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे नाही जी जुनी व्यक्ती होते राष्ट्रवादीमध्ये त्या नावाने ते कार्यालय आहे आणि ते आता पक्षात काम करत नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने कार्यालय सुरू करून नव्या जोमाने नव्या ताकतीने काम करू पिंपरी चिंचवड शहरात इथून मागे जे काही आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये मी इमरान शेख सातत्याने पुढाकार घेत होतो त्याच पुढाकाराने आताही माझ्या आंदोलन आणि माझे कामकाज चालू राहील पिंपरी चिंचवड शहरात अनेक दिग्गज पैसेवाले मंडळी आहेत त्यांच्यासमोर तिकडं अवघड आहे पण कार्यकर्त्यांचे आजची एकी आणि ताकद पाहता मला आज विश्वास वाटतो चिंचवड शहरात आज पवार साहेबांसोबत नाहीत त्यांना नक्कीच या चा पश्चाताप होईल कारण आम्ही विचारांची लढाई लढत आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थासाठी पक्षात काम करत नाही असे वक्तव्य पत्रकार परिषदेत इम्रान शेख यांनी केले

मागील काही दिवसांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. त्यातील एक गट सत्तेमध्ये सहभागी झाला तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिला. या फुटीचे पडसाद संबंध देश आणि महाराष्ट्राबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील उमटले. पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवकांनी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली तर पक्ष संघटनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर दोन्ही गटाकडून दावे प्रतीदावे करण्यात येत आहेत. एका बाजूला पक्षाच्या अजितदादा गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्षांची निवड नव्याने केली तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यकारी समिती जाहीर केली. त्यानुसार सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर यांच्यावर शहरात कार्य पुढे सुरु ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.

या समितीने रावेत येथील एक हॉल मध्ये राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित सहविचार बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शरद पवार यांच्या सोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या पुढील काळातील पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची वाटचाल, आगामी उपक्रम, संघटनेच्या विविध निवडी, महापालिकेचे कामकाज आणि शहरातील प्रश्न यावरील पक्ष संघटनेची भुमिका इ. बाबतीत या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे भव्य कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले. तसेच यावेळी राहुल आहेर यांची विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आणि मयूर जाधव यांची सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या पुरोगामी, समतावादी, धर्मनिरपेक्ष विचारांवर निष्ठा ठेवून समाजकारण व राजकारण करणाऱ्या लोकांना एकत्र आणणार असून त्यांची मोट बांधून संघटन करणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समतेच्या राजकारणातून जनतेचा विकास ही प्रथम पासून भूमिका घेतलेली आहे, या पुढील काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समतेचा शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार टिकवण्यासाठी आम्ही आमची लढाई सुरू केली आहे.

विचारसरणीला तिलांजली देऊन विकासाचे राजकारण यशस्वी होणार नाही. शरद पवार साहेबांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्रचना मिशन (JNNURM) साठी निधी उपलब्ध करून दिला. पिंपरी चिंचवड मध्ये २००५ पासून शाश्वत शहर विकास योजनेचा प्रारंभ झाला.

२००४ मध्ये मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्रचना मिशन (JNNURM) अंतर्गत पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक रूप देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला. गोरगरीब, श्रमिकांसाठी घरकुल योजना, रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक बस वाहतूक सक्षमीकरण, विविध उड्डाणपूल, स्पाईन रस्ते, पर्यावरण प्रकल्प, सांस्कृतिक सभागृहे, खेळांची मैदाने, गार्डन्स, सायन्स पार्क ई. विविध विकास प्रकल्पासाठी व्हिजन मिशन निश्चित करून शरद पवार साहेबांनी केंद्राचा कोट्यवधी रुपयांचा निधी पिंपरी चिंचवड शहराला उपलब्ध करून दिला या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला.

मात्र २०१४ साली सत्तेत आल्यावर भाजपने मनमोहनसिंग सरकारच्या काळातील शहर विकास योजनांची योजनांची एका बाजूला नावे बदलली तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड शहराच्या विकास निधीला कात्री लावली. २०१७ नंतर शहरातील शिवसेनेचे तत्कालीन खासदार आणि भाजपचे आमदार केंद्राचा विकास निधी आणण्यात कमी पडले. त्यातही जो काही निधी आला त्यातही प्रचंड भ्रष्टाचार सुरू झाला. उघडं उघडं टक्केवारीची भाषा बोलली जावू लागली. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचाराचे प्रमाण एवढे वाढले की भाजपाच्याच नगरसेवकांनी उघड उघड या विरोधात आंदोलन करायला सुरुवात केली.

त्यातूनही जी थोडीफार विकासकामे २०१७ झाली समीक्षा केल्यास राष्ट्रवादीच्या काळात तयार झालेले मुख्य रस्ते आणि उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर यांच्या कडेचे फुटपाट आणि रंगरंगोटी सोडल्यास इतर ठिकाणी कुठे विकास दिसत नाही. स्मार्ट सिटीतील मोठा गाजावाजा करत सुरू केलेले कित्येक उपक्रम आज बंद पडले आहेत. गल्ली बोळात,उपनगरातील अंतर्गत भागात मूलभूत नागरी सेवांची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे. शहराच्या नागरिकांची पाण्याची गरज देखील भाजपा आमदार आणि नगरसेवक भागू शकले नाहीत.

भाजपच्या कार्यकाळात पाणी पुरवठा, वाहतूक नियोजन, शहर बससेवा, आरोग्य, घरकुल योजना, इंद्रायणी, पवना सुधार प्रकल्प आदी स्मार्ट सिटीच्या विविध कामातील गती धीमी झाली आहे. आणि भ्रष्टाचार वाढलेला आहे. विचारसरणी सोडून भाजपच्या सत्ताकेंद्री राजकारणाबरोबर जाणं आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत समतावादी विचारांवर श्रद्धा ठेवून शहरात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राजकारण व समाजकारण करणार आहोत, असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी माधव पाटील, राजू खंडागळे, विजय पिरंगुटे, सचिन निंबाळकर, राहुल नेवाळे, अनिल भोसले, संदिप चव्हाण, योगेश सोनवणे, संतोष माळी, सागर भुजबळ, राजेश हरगुडे, के डी वाघमारे, बिरुदेव मोटे, अण्णा पाखरे, रोहित जाधव, राजेश बरसागळे, पंडित कांबळे, सचिन सकाटे, सुयश भोसले, किशोर पवार, जावेद पठाण, शादाब खान, नितीन मोरे, उमेश डोरले, राजेश माने, सलीम डांगे, विशाल जाधव, ज्योती निंबाळकर, स्वप्नाली आसोले, वैशाली पवार, पंचशीला आगळे, अश्विनी आगळे, नाजुका वाल्हे, सुप्रिया कवडे, संजीवनी पुराणिक, ज्योती जाधव, आयेशा शेख, सुजाता पाटील, कमरूनिसा शेख, ओम क्षीरसागर, पियूष अंकुश, शाहिद शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
Next articleपिंपरी चिंचवड शहरातील रेल्वे प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा आकुर्डी रेल्वे स्थानकाचा होणार विकास – शंकर जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + 6 =