Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्षपदी मोरेश्वर भोंडवे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्षपदी मोरेश्वर भोंडवे

275
0

रावेत, दि. २२ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीत जनतेत स्थान असणाऱ्या नेत्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची आज (दि. २०) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भोंडवे यांना निवडीचे पत्र दिले.

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून बुधवारी (दि. १९) अध्यक्षांसह पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आज मोरेश्वर भोंडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे वलय आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे.
 शहरात राष्ट्रवादी जोमाने वाढावी म्हणून मी कार्यरत राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ वेगाने वाटचाल करेल याची मला खात्री आहे. पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन.
मोरेश्वर भोंडवे, कार्याध्यक्ष (नवनिर्वाचित), राष्ट्रवादी काँग्रेस

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे
Next articleशासकीय अनास्थेचा पहिला बळी वर्ध्यात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 17 =