Home ताज्या बातम्या स्वर्गीय हुकुमीचंद वनराज बरलोटा यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा

स्वर्गीय हुकुमीचंद वनराज बरलोटा यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा

302
0

किवळे, दि.16 जुलै 2023(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- एस आय ए चे बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या वतीने स्वर्गीय हुकुमीचंद वनराज बरलोटा यांचा जन्मदिवस मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. (दि.13) कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे समाजसेवक रवींद्र( लहू मामा) शेलार हे उपस्थित होते. पहिली ते दहावी या वर्गातून सन 2022-23 ला प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये 1000 रोख रक्कम व वाढदिवसाच्या स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शाळेने सन 2022-23 मध्ये असणाऱ्या दहा गरीब विद्यार्थ्यांना स्वर्गीय हुकमीचंद अनराज बरलोटा यांच्या नावाखाली फ्री शिप देण्यात आली.साउथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष तथा याचे बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन जय शंकर जयसिंग, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्रीमती पार्वती बाबू, संस्थेचे खजिनदार तसेच शाळेचे व्हाईस चेअरमन जेकब नाडार,सहसचिव ऐ के प्रेमचंद्रन विश्वस्त जोगेंद्र भाटिया, अँथोनी स्वामी, वेंकटेश ओलारी इत्यादी संस्था व शाळेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ शर्मिला गायकवाड याच्या नियोजनात कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये स्वर्गीय हुकुमीचंद अनराज बरलोटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांचे जैन धर्मांचे धर्मगुरू गुरु गणेश मलजी व त्यांचे गुरु मंत्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची दीप प्रज्वलन करून पूजा करण्यात आली दीप प्रज्वलन संस्थेचे पदाधिकारी व समाजसेवक यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेतील नवीन तीन स्टाफ रूमचे उद्घाटन करण्यात आले.रवींद्र उर्फ लहू मामा शेलार यांनी शाळेच्या नवीन सायन्स लॅब करता लागणारे साहित्य त्यांच्यातर्फे देण्याचे जाहीर केले. शाळेतील सर्व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

 

Previous articleबापापेक्षा जास्त नेत्याला मननाऱ्यांची चांगलीच गोची,राजकारणातील अनैतिकता महाराष्ट्राला घातक-डॉ जितीन वंजारे
Next articleशंकर जगताप यांच्या पुढाकाराने चिंचवड मतदारसंघात “टिफिन बैठक” उत्साहात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 1 =