Home ताज्या बातम्या मुकाई चौकातील त्या गाळ्यांनवर कारवाई कधी होणार,रुग्णालयाची आरक्षीत जागा प्रशासनाकडुन ताब्यात घेण्यास...

मुकाई चौकातील त्या गाळ्यांनवर कारवाई कधी होणार,रुग्णालयाची आरक्षीत जागा प्रशासनाकडुन ताब्यात घेण्यास दिरंगाई का?

225
0

किवळे,दि.०६ जुलै २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुकाई चौक होत चालय वाहनतळ,चौकात गुप्ता यांच्या जागेवर हाॅस्पीटल चे आरक्षण आहे.माञ गुप्ता यांनी आरक्षण डेव्हल्पमेन्ट करता ताब्यात न घेता त्या ठिकाणी दुकानाचे पञाशेड,व अन्य स्वरुपात गाळे भाड्याने देत व्यवसाय करत आहेत.गुप्ता यांनी काढलेले गाळे अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे.व त्यांनी ते पार्कींग व्यवस्था न करता फुटपाथ ला खेटुन उभे केले आहेत.त्यामुळे त्या दुकानानी येणारे लोक फुटपाथ समोर रस्त्यावरच गाड्या बेशिस्तपणे पार्क करतात. रस्ता रुंदीकरण होऊन सुद्धा राजरोस पणे गाड्या उभ्या असतात. त्यामुळे चौकातुन येणार्‍या जाणार्‍या गाड्यावाल्याना तेथुन कसरत करावी लागते,गुप्ता ने दुकाने सुरु केल्यामुळे आजु बाजुला समोर सर्व फुटपाथ व रस्त्याच्या दोन्ही बाजुना दुकानांनची रिघ लागली आहे.माञ तरीही गुप्ता यांच्या जागेत चहा मेडिकल,भाजी, हाॅटेल टाईप व्यवसाय असल्याने गर्दी होते.त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था किंवा सेक्युरीटी गार्ड अथवा पार्कींग व्यवस्थित लागावी व रस्ता खुला राहवा अशी सोय केली जात नाही.चौकात सकाळी व संध्याकाळीच वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचे मुकाई चौकात फेरफटका मारल्यास सहज लक्षात येते. त्यामुळे गुप्ता यांच्यावर महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करवी व अधिकृत परवानगी घेऊन पार्कींग व्यवस्था करत दुकाने मागे घेण्यास लावावे.त्यामुळे दुरघटना होऊ नये वादावादीचे प्रसंग घडत असतात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथे किरकोळ वादावादीचे प्रसंगही उद्‌भवत आहेत. वाहनधारकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. याशिवाय परिसरातील व्यावसायिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.रस्त्यावर सातत्याने गर्दी होत आहे. शिवाय कामगार, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व नोकरदारांची येथे सातत्याने ये-जा असते. ऐन गर्दीच्या हंगामातच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होऊनही गर्दी होते. बस स्थानक चौकात वाहतूक कोंडी होण्याची समस्या वारंवार निर्माण होत असून त्यावर लवकर तोडगा काढावा अशी नागरिकांन कडुन मागणी केली जात आहे.


मुकाई चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकात ट्राफिक सिग्नल उभारण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेले ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. मात्र काही आठवडय़ातच सदर सिग्नल बंद पडले असून, चौकात वाहतूक कोंडीची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर ट्रफिक सिग्नल शोभेसाठी बसविण्यात आले आहेत का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.चौकात फलक आणि ट्रफिक सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. चौकात ट्रफिक सिग्नलची उभारणी करण्यासाठी निधी खर्च केला आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून स्मार्ट सिटीच्या कंट्रोल ऍण्ड कमांड सेंट्रलला जोडण्यात आले आहे. याअंतर्गत विविध चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू करण्यात आले होते. पण काही दिवसांतच चौकातील ट्रफिक सिग्नल बंद पडले असून,चौकात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांचे विकासाचे काम सुरू असल्याचे सांगून ट्रफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. पण बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण झाले असताना ट्राफिक सिग्नल बंद ठेवण्याचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
मुकाई चौक वाहतुक कोडींपासुन मोकळा श्वास कधी घेईल,व रस्त्यावरील व्यापार्‍याना हाॅर्कस झोन कधी मिळणार अशा अनेक प्रश्नाना उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे बेकायदेशीर रित्या काम चलाव स्थिती आहे.माञ गुप्ता वर योग्य कारवाई झाल्यास सर्व व्यापार्‍याना झटका बसेल व नियमित करण्यासाठी पालिका प्रशासनाशी पाठपुरावा करतील.त्यामुळे मुकाई चौकात बेशिस्त गाडी लावणारे,वादावादी करणारे,गुन्हेगारीचे प्रमाण या सर्वावर आळा बसेल.

दवाखान्याचे सोयीसाठी रुग्णालयाच्या आरक्षण असलेली जागा महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मोठे रुग्णालय लवकरात लवकर तयार करावे अशी नागरिकांचे मागणी होत आहे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी किवळे चौकात जर रुग्णालय झाले अनेक नागरिकांना त्याचा दिलासा मिळेल. आरोग्य सुविधा पासून जवळजवळ कोणी वंचित राहणार नाही सर्व गरजू आणि अपेक्षित वर्ग या साईडला असल्याने त्यांना त्याचा फायदा नक्की होईल

Previous articleरावेत परिसरात रस्त्याची दुरावस्था नागरिकांच्या जीवाशी खेळ आयुक्त साहेब तातडीने लक्ष द्याल का?
Next articleबापापेक्षा जास्त नेत्याला मननाऱ्यांची चांगलीच गोची,राजकारणातील अनैतिकता महाराष्ट्राला घातक-डॉ जितीन वंजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 13 =