Home ताज्या बातम्या मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

88
0

मुंबई,दि. ५ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, १३ जुलै २०२३ पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत.

सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी जीवितास धोका, मालमत्तेची हानी, कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्याचा कोणताही वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

तसेच, विवाह, अंत्यसंस्कार, कंपन्या, क्लब, संस्था, संघटना यांच्या बैठका, सामाजिक मेळावे, चित्रपटगृहे, नाटकगृहे, शाळा महाविद्यालये, कारखाने, दुकाने, व्यवसायासाठी संमेलने अशा कार्यक्रमास यातून सूट देण्यात आली असल्याची माहितीही पोलीस आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

Previous articleमहिला रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Next articleशिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 3 =