Home ताज्या बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन

69
0

नागपूर ,दि. ५ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोराडी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होते.मंदिर समितीतर्फे अध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी देवीच्या प्रतिकृतीची भेट देऊन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे स्वागत केले. काल सायंकाळी राष्ट्रपती मुर्मू यांचे नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. आज सकाळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहिल्या. दुपारी 4.40 च्या सुमारास कोराडी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या.श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर पुरातन असून भोसलेकालीन साम्राज्यात या मंदिराचे मूळ बांधकाम करण्यात आले. 2017 ते 2022 या कालावधीत मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. राज्य शासनाने या मंदिराला तीर्थ व पर्यटन क्षेत्र ‘ब’ श्रेणीचा दर्जा दिला आहे.

Previous articleशिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Next articleपुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 20 =