Home ताज्या बातम्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

199
0

मुंबई, दि. २ जुलै २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  विधानसभेचे सदस्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Previous articleशहरालगत गहुंजे येथे स्टेडियम असताना नव्याने ४०० कोटींची उधळपट्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी: नाना काटे
Next articleमागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =