Home ताज्या बातम्या देहुरोड- तब्बल १८ वर्षानी पुन्हा भरणार दहावीचा वर्ग

देहुरोड- तब्बल १८ वर्षानी पुन्हा भरणार दहावीचा वर्ग

138
0

देहुरोड,दि.०७ मे २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- श्री शिवाजी विद्यालय देहूरोड मध्ये तब्बल १८ वर्षानी पुन्हा भरणार २००५ व २००६ चा दहावीचा वर्ग एक आगळ वेगळा असा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

उगवतीचा सूर्य आता मावळतीकडे पोहोचला आहे !! मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे !! तक्रार नाही खंत नाही सांगण्यासाठीच प्रवास असतो !!  एक दिवस मिटण्यासाठीच काळजा मधला श्वास असतो !!

तब्बल १८ वर्षानी पुन्हा भरणार २००५ व २००६ चा दहावीचा वर्ग, १८ वर्षानी होणार्‍या गाठीभेटी, शिक्षकांनी घेतलेली हजेरी, सर्वांच्या चेह-यावरील आनंद- उत्साह,जुने वर्गमित्र मैत्रिणी, एकमेंकाची आपुलकीने आपलेपणाने विचारपुस- बोलचाल, ग्रुपमध्ये घेतलेले जुने फोटो यामुळे शाळेतील जुन्या आठवणी उजाळा मिळणार, संपुर्ण दिवसभर दहावी पर्यंत शाळेत थबकलेले पाय आणि २०२३रोजी या वर्षी तेवढ्याच आनंदाने उत्साहाने पुन्हा एकत्र येण्याचा केलेला माजी विद्यार्थ्यांचा निश्चय यासोबत आपल्या शाळेसाठी काहीतरी करायचे असे अश्वासन देवून घेवून माजी दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा श्री शिवाजी विद्यालय देहुरोड या ठिकाणी लवकरच पार पडणार.

ज्या गुरूंनी शालेय जीवनात जीवनमूल्यांचे संस्कार केले. आयुष्याला आकार दिला. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आयुष्य घडविता आले. अशा शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन २००५ व २००६ पासआऊट व नापास झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.
आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात ही शालेय जीवनातूनच होते मुक्त आयुष्य जगण्याचा मार्ग म्हणजे शाळा तर आई-वडील हे फक्त घरी मार्गदर्शन करतात परंतु शाळेतील शिक्षक हे आपले आयुष्य घडवत असतात दहावीचा वर्ग पुन्हा एकदा भरण्याचा अनुभव तेव्हाचे दिवस किंवा जीवन व आत्ताचे दिवस किंवा जीवन यामध्ये खूप फरक झालेला जाणून येत आहे. या स्नेह मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी यांनी आज एकञ येथ एक बैठक घेऊन लवकरच तारीख जाहीर करुन स्नेह मेळावा घेण्याचा निर्धार केला. प्रत्येकाने आपापल्या जवळच्या विद्यार्थ्यांना वर्गातले वर्गमित्र या सर्वांना एकमेकांना निरोप देऊन स्नेह मेळाव्याचे माहिती देऊन त्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगावे असे निर्णय घेण्यात आले
सोशल मीडिया मुळे जग खूप पुढे पुढे जात आहे मात्र तरीही अनेक जण एकत्र येऊन एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असतात सोशल मीडियाच्या जग किती जरी पुढे गेले तरी मात्र आजही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणारा विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयान शेवटचे वर्ष खूप आनंदाने आणि आठवणी साठवून ठेवतात आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व ज्या शिक्षकांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर संस्कार केले अशा शिक्षकांच्या कृतींना त्या व्यक्त करण्यासाठी व सर्वच माजी विद्यार्थी जे एकमेकांना त्याच्या चुका असतील किंवा गमती जमती असेल यामध्ये काही ना काही शिकवत गेल्यात या सर्वांचं एकमेकांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लवकरच श्री शिवाजी विद्यालय देहुरोड या ठिकाणी इयत्ता दहावी पासआऊट बॅच २००५ व २००६ मधील विद्यार्थी एकञ येत आहेत. त्यासाठी आज श्री शिवाजी विद्यालय देहुरोड या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीस कुणाल ठोंबरे,राजेंद्र तरस,प्रमोद बालघरे,इम्रान तांबोळी,प्रकाश म्हसे,रफिक शेख,राहुल सवाई,महेश पटेकर,अदिनाथ शिंगाडे,रोहित गायकवाड,किरण गवळी,संचित गुगलिया,सागर ठोंबरे,सुरेश चंदनगुडे,मयुर तरस,किरण बनसोडे,प्रविण कांबळे,धिरज शिंदे,प्रसाद धुमाळ,जिंतेद्र चव्हाण,प्रविण ठोकळे,माजी विद्यार्थीनी प्रतिमा पाटील आदी सुमारे पन्नास माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleवाहात्या नाल्यामध्यले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पचे (एस.टी.पी.) अनाधिकृत बांधकाम त्वरित पाडावे.
Next articleपूर्वतयारी बैठक-निर्मल, हरित आणि आनंददायी पालखी सोहळ्यासाठी नियोजन करा- विभागीय आयुक्त सौरभ राव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 4 =