किवळे,दि.१६ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- किवळे मामुर्डी साईनगर सह अन्य भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे नागरीकांची ओरड सुरु आहे.माञ या कडे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख राजेंद्र तरस यांनी लक्ष घातले आहे.त्यामुळे युवा नेतृत्वात हा प्रश्नी मार्गी लागणार का ? की नागरिकांच्या आश्वसनावर पाणी पुसले जाणार अशी चर्चा प्रभागात रंगली असुन विरोधकांनी या कडे बघ्याची भुमिका घेतली असुन हंडा मोर्चा होऊ नये अशी सेंटीग देखील लावली जात असल्याचे बोलल जात आहे.त्यामुळे उद्याचा हा मोर्चा शहरात चर्चेचा विषय ठरणार हे माञ खर.
प्रभाग क्रमांक २४ विकासनगर किवळे मामुर्डी साईनगर सह परिसरामध्ये खूपच कमी दाबाने पिण्याचे पाणी सोडले जाते,त्यामुळे पाणी सोडण्याचा क्षमतेपेक्षा कमी पाणी सर्व प्रभागाच्या नागरिकांच्या वाटेला येते, त्यामुळे महिला वर्गात फार मोठा रोष निर्माण झाला आहे. पाणी कमी सोडले जाते व ते पण एक दिवसा आड सोडले जाते.नागरिकांना प्रभागामध्ये पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी १७ मार्चला सकाळी ११.००वा. ब प्रभाग क्षेञिय कार्यालयावर राजेंद्र तरस(युवा सेना उपशहर अधिकारी पि.चि) यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा भव्य हंडा मोर्चा काढणार आहे. होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहील असे ब प्रभाग क्षेञिय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.नागरीकांचे प्रश्न मार्गी लागणार की रोष तसाच राहणार या कडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.