Home ताज्या बातम्या कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक जाहिर ; २७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार...

कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक जाहिर ; २७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार मतदान

0

चिंचवड,दि.१८ जानेवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या दोन विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम झाहिर झाल्याने अनेकांच्या मनात आमदार होण्याची जिज्ञासा जागी झाली आहे.हि निवडणुक बिनविरोध झाल्यास पाहिजे तेवढा फरक पडणार नाही.माञ निवडणुक बिनविरोध न झाल्यास अटीतटीची रंगत पाहिला मिळेल.

पोटनिवडणुक कार्यक्रम जाहिर
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − nineteen =