चिंचवड,दि.१० डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – वादग्रस्त वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर चिंचवड येथे शाई फेकण्यात आली. चिंचवड येथे मोरया गोसावी महोत्सवाच्या उद्धघाटनासाठी आले होते. कार्यक्रम होण्यापूर्वीच आंबेडकरी योद्धांने शाई फेकली व कर्मवीर भाऊराव पाटील,मा.फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला,भाजपायी कार्यकर्ते हे पोलिस कुठयेत काय करतात एवढच बोलत राहिले,चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते.त्याचे पडसाद संपुर्ण महाराष्र्ट भर उमटत आहेत. तर भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.माञ पोलिसांना पुढे करुन लोकशाहीचा गळा घोटला जात आहे याचा राग मनात धरून आंबेडकरी योद्धा मनोज गरबडे या कार्यकर्त्यांने चिंचवड येथे सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली.तर दुसरा आंबेडकरी योद्धा विजय ओहोळ यांने घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. यावेळी शाईफेक करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.माञ वंचित बहुजन आघाडीचे विजय ओहोळ व समता सैनिक दलाचे मनोज गरबडे यांना अटक होताच चिंचवड पोलिस्टेशन ला कार्यकर्ते धावुन आले तरी सर्व परस्थिती अटोक्यात असुन फक्त शाई फेक झाली म्हणुन चंद्रकांत पाटील बचावले कार्यकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल की काय अशी परस्थितीथी संपुर्ण महाराष्र्टात निर्माण झाली आहे.सुरुवात पिंपरी चिंचवड मध्ये झाली.शाई फेक करणार्याचे शिव फुले शाहु आंबेडकर सर्वच महापुरषांना मानणार्या समुहाकडुन अभिनंदन केले जात आहे.
चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य काय केले होते?
पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी वादग्रस्त विधान केले.अ शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता? डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले होते व त्या वाक्यावर ठाम असल्याचे स्पष्ट सांगितले होते.
यापूर्वीची वादग्रस्त विधाने
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना, खासदार आहात ना, समजत नसेल, तर घरात बसा, स्वयंपाक करा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. डिसेंबर २०११ मध्ये विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदींनी त्यावर कळस चढवण्याचे काम केले, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात, असे म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.