Home औरंगाबाद फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली चंद्रकांत पाटीलांच वादग्रस्त वक्तव्य

फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली चंद्रकांत पाटीलांच वादग्रस्त वक्तव्य

77
0

पैठण,दि.०९ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने आदर्श संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. राज्यपालांच्या विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चा देखील आयोजित केला आहे. त्यातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे.पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी संबोधताना म्हटलं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली,

राज्यात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू आहे. याचदरम्यान, भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ‘कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.’कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात पुढे म्हणाले, ‘अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशामध्ये शाळा कुणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली’.

‘शाळा सुरु करायच्या आहेत आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा-दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढं गेलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?
काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपाल म्हणाले होते, ‘तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील’

‘शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

Previous articleबाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कार्यकणी जाहिर,पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष पदी निलेश तरस तर युवासेना शहर संघटकपदी राजेंद्र तरस यांची निवड
Next article‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ संमेलनाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 4 =