Home ताज्या बातम्या गुटखा बंदी तरी पिंपरी चिंचवड शहरांत गुटखा विक्री जोरात सुरू

गुटखा बंदी तरी पिंपरी चिंचवड शहरांत गुटखा विक्री जोरात सुरू

97
0

पिंपरी,दि.२१ ऑक्टोबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री जोरात सुरू असून महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री बंदी घातली असून गुजरात व कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चोरुन गुटखा आणला जात आहे मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असून गुटखा विक्री प्रकरणात मोठं रॅकेट कार्यरत असून पिंपरी चिंचवड शहर पोलिस तसेच ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी गुटखा विक्री रॅकेटमध्ये सहभागी आहेत शहरातील प्रत्येक हातगाडी व टपरी ह्या ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत आहे मुख्यतः शाळा कॉलेज व मुख्य बस स्टॉप रेल्वे स्टेशन रुग्णालय तसेच गल्ली बोळात गुटखा विक्री सुरू असून पिंपरी चिंचवड शहर गुटखा विक्री राजधानी म्हणून ओळखली जावू लागली आहे गुटखा विक्री प्रकरणातील टपरी व हातगाडी धारक ह्यांना गुटखा विक्री प्रकरणी पोलीस कर्मचारी ह्यांना मासिक अडीच हजार रुपये हप्ता द्यावा लागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री प्रकरणात पोलिस स्टेशन येथील हप्ता वसुली कर्मचारी ह्यांना मासिक गुटखा विक्री हप्ता द्यावा लागत असतो? पोलिस प्रशासन फक्त गुटखा विक्री प्रकरणात छोटी मोठी कारवाई कागदोपत्री नोंद करून दाखवत असते वर्तमान पत्रात गुटखा विक्री प्रकरणात गुन्हा नोंद केला म्हणून दाखवण्यात येते वस्तुस्थिती वेगळी असून पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात गुटखा विक्री प्रकरणात पुणे व पिंपरी चिंचवड गुटखा राजधानी म्हणून प्रसिद्ध झाली आहे, सणासुदीच्या काळात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री करण्यासाठी दलाल व मोठे व्यापारी सरसावले असून पोलिस आयुक्त व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने गुटखा विक्री पिंपरी चिंचवड शहरातील गल्ली बोळात सुरू असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी गुटखा विक्री बंदी प्रकरणात दखल घेऊन पिंपरी चिंचवड व पुणे येथील गुटखा विक्री प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करुन गुटखा विक्री प्रकरणातील मोठ्या व्यापारी ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते यांनी इ-मेल द्वारे थेट मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

Previous article“आठवण धर्मांतराची-1956” धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने या व कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा -विकास कडलक
Next article” अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात आज माझी दिवाळी उजळून निघाली ” – इरफानभाई सय्यद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − eight =