Home ताज्या बातम्या ‘दगडूशेठ’चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान, देखावा अनेक देवी-देवतांच्या मूर्तींनी सुशोभित

‘दगडूशेठ’चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान, देखावा अनेक देवी-देवतांच्या मूर्तींनी सुशोभित

78
0

पुणे,दि.०५ सप्टेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पंचकेदार मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासादाच्या उत्तुंग कैलास शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिध्द ओंकाराच्या त्रिशूल-डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे.नागांच्या नक्षीदार लतिन कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिव शक्तीचे अर्थातच शिवपार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२१ झुंबर लावण्यात आली आहेत. तर, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासाद, अनेक देवी-देवतांच्या, व्याल, शार्दुलांच्या, यक्षगणांच्या, सुरसुन्दरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी शोभित झाला आहे.

Previous articleचांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांना गती द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Next articleमॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकावर मोबाइल चोरांचा कोयत्याने जीवघेणा हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 4 =