Home ताज्या बातम्या पुणे जिल्हा पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षकासह कार्यक्रम जाहीर करा – संतोषनाना डोळस

पुणे जिल्हा पक्षांतर्गत निवडणुकीसाठी निरीक्षकासह कार्यक्रम जाहीर करा – संतोषनाना डोळस

89
0

पुणे दि.२४ ऑगस्ट२०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पक्षाची संपूर्ण देशभरातील सर्व पदाधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाची पदे बरखास्त करण्यात आली आहेत.अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले साहेबांनी नुकतीच केली आहे त्याअनुशंगाने पुणे जिल्हा रिपाइं(आठवले) या पक्षांत लवकरच नवचैतन्य निर्माण होणेसाठी तसेच पक्षांतर्गत निवडणुकीसाठी पक्ष सदस्य अभियानांतर्गत नविन सभासद मोहीम क्रियाशील सभासद निवडणुक निरीक्षकांसह लवकरच कार्यक्रम जाहीर करण्यात यावा अशी मागणी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणी कडे तसेच दि.२५ ऑगस्ट२०२२ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे मा. रामदास आठवले साहेबांना भेटून लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रभारी पुणे जिल्हा निमंत्रक संतोषनाना डोळ्स यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे यावेळी मोठ्यांसंखेने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.पक्षाला निवडणुकीतुन जिल्हाध्यक्ष दिल्यास जिल्हातील सभासद संख्या वाढेल आणि कार्यकर्त्यान मध्ये अध्यक्ष पद निवडीसाठी जिल्हा भर पक्षाचा कारभार वाढेल जिल्हाभर रिपाईचा आवाज फिरेल आणि पक्षाची ताकत वाढेल त्यासाठी जिल्हाध्यक्ष हा क्रियाशील सभासदांमार्फत लोकशाही पद्धतीने निवडणुकीतुनच निवडण्यात यावा अशी संपुर्ण पुणे जिल्हातील कार्यकर्त्याची मागणी आहे.

Previous articleगणेश उत्सवा निमित्त खास ऑफर फक्त प्रजेचा विकास वर
Next articleत्या महावितरणच्या अधिका-यांवर कारवाई करा,अन्यथा रस्त्यावर उतरुन जाब विचार-संतोष सौंदणकर(शिवसेना शहर संघटक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × four =