Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी,जिल्हाध्यक्ष हि पदे बरखास्त...

रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी,जिल्हाध्यक्ष हि पदे बरखास्त – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

127
0

मुंबई दि. 19 ऑगस्ट 2022( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या मनमानी कारभार करणाऱ्या जिल्हाध्यक्ष व राज्य कमिटी जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना बसणार चाप तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोण होणार राज्याच्या कमिटी मेंबर तसेच जिल्हा कमिटी मेंबर व कोण होणार नवीन जिल्हाध्यक्ष याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)या पक्षाच्या देशभरातील सर्व राज्यांच्या राज्य कमिटी चे अध्यक्ष आणि राज्य कमिटी तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कमिटी ही पदे बरखास्त करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा स्वताः रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या देशभरातील राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी अधिकृतरित्या बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन जिल्हा अध्यक्ष जिल्हा कमिटी तसेच देशभरातील राज्य कमिटी नव्याने पक्षांतर्गत निवडणूक घेऊन करण्यात येईल अशी अधिकृत घोषणा ना.रामदास आठवले यांनी आज मुंबईतुन केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी ची निवडणूक झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदी ना.रामदास आठवले यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यानंतर आता देशभरातील सर्व राज्य कमिटी आणि जिल्हा कमिटी नव्याने निवडणूक घेऊन नियुक्त करण्यात येणार आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्हाध्यक्षांचा मनमानी कारभार इतर पदाधिकाऱ्यांमध्ये चढा ओढ करण्यासाठी जुपून द्यायच.आणि स्वता माञ खुप भारी हे दाखवायच पदाची लालसा आणि मुजोरी आता बंद होणार सर्वच जिल्हाध्यक्ष बरखास्त केल्यामुळे पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे.सर्वच पदाधिकारी कामाला लागले असुन पक्षांतर्गत गटबाजी मुळे जिल्हा अध्यक्षाचा मुजोरी पणा मुळे पक्षातुन बाहेर जाणारे कार्यकर्ते थांबले गेलेत.व पक्षात कार्यकर्त्याची मोठी इनकमिंग होणार असल्याचे सर्व कार्यकर्त्यान मध्ये बोलले जात आहे.तर आठवले साहेबांनी अचानक घोषणा केल्यामुळे इतर सर्व पक्षांचे रिपब्लिकन पक्षांकडे लक्ष लागून आहे.

Previous articleकिवळेतील बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांचे पीएमपीएमएलला खरमरीत पत्र
Next articleगणेश उत्सवा निमित्त खास ऑफर फक्त प्रजेचा विकास वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − seventeen =