Home ताज्या बातम्या मावळ-फाशी ची शिक्षा द्या..कोथुर्णे गावातील चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेर्धात किवळे येथे सर्वपक्षीयांची...

मावळ-फाशी ची शिक्षा द्या..कोथुर्णे गावातील चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेर्धात किवळे येथे सर्वपक्षीयांची मागणी

100
0

किवळे,दि.९ ऑगस्ट २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ तालुक्यातील कोर्थेुणे गावातून एका सात वर्षीय मुलीचे मंगळवारी अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती.सात वर्षीय मुलगी मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. अखेर बुधवारी (३ ऑगस्ट) तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर गावातील शाळेच्या पाठीमागे तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला. तिच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस पुढील तपास करत आहेतया चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली आहे. या प्रकरणात तेजस उर्फ दाद्या महिपती दळवी असे संशयिताचे नाव असून संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माञ मात्र आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व हे प्रकरण फास्टट्रॅक मध्ये चा चालवावे अशी मागणी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून होत आहे मावळ तालुक्या जवळ असणार्‍या हवेली तालुक्यातील किवळे गाव या ठिकाणी मुकाई चौकात किवळे गावातील ग्रामस्थ व सर्वपक्षीयांच्या वतीने आज जाहीर निषेध मोर्चा घेण्यात आला घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सर्वांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा व लवकरात लवकर निकाली काढा अशी मागणी करण्यात आली.अतिशय शांततेने सर्व नियमांचे पालन करुन निषेध मोर्चा काढण्यात आला अशी माहिती मनसेचे सचिन शिंगाडे यांनी दिली.या वेळी विकासनगर किवळे भागातील सर्व पक्ष संघटना एकञ येत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी सचिन शिंगाडे,बापु कातळे,राजेंद्र तरस,विनोद भंडारी,सुदाम तरस,दिलीप कडलक,नवनाथ तरस,नवनाथ लोखंडे,दिपक भोंडवे, निलेश तरस, मंगेश कडू, संजय पिंजण, निलेश साळुंखे, नवनाथ तरस, लखन तरस, संतोष भोंडवे, रोहिदास दांगट, गणेश जुनवणे, पराग तरस, शुभांगी वानखेडे, सिंधुताई तंतरपाळे, निर्मला चव्हाण, बापू कदम, रोहित माळी, साधनाताई दत्तात्रय तरस, आशा तरस,सविता तरस, पूनम काळे, मीना तरस, कल्पना तरस, स्नेहल तरस, सुवर्णा म्हसुडगे, सारिका सोनवणे, मीना जगदणे, बेबी तरस, सोनम तरस, अनुराधा तरस, सोलमनराज भंडारी,राजू मारीमुत्तु,किरण गवळी,जावेद जागीरदार,फरीद शेख,कमसनिया शेख,नसीम खान, दत्ता सोनू शेख सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

Previous articleचलो पुणे…नविन  कामगार कायदे  धोरणाविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ  भोसले यांचे  १० ऑगस्ट पासून प्राणांतिक उपोषण
Next articleदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला नगरपरिषद करा देहूरोडकरांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + seven =