Home ताज्या बातम्या ‘…तरीही शिवसेना सोडणार नाही; संजय राऊतांचे ट्विट करून सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

‘…तरीही शिवसेना सोडणार नाही; संजय राऊतांचे ट्विट करून सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

87
0

मुंबई ,दि.31 जुलै 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली आहे. राऊत त्यांच्या भांडुपच्या घरी इडीचे अधिकारी दाखल झालेत. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून ट्विट करून म्हणालेत,  खोटी कारवाई.., खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, तरीही शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.संजय राऊत पुढे म्हणतात, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..मी शिवसेनेसाठी लढत राहीन,असे ते म्हणाले आहेत.

प्रकरण काय?

संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली आहे. राऊत त्यांच्या भांडुपच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झालेत. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे.पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होत असल्याची माहिती आहे.  यावेळी आता पुढील कारवाई काय होणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

Previous articleसुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख,महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम
Next articleतब्बल साडेनऊ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर संजय राऊतांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 4 =