Home ताज्या बातम्या चंद्रभागा कॉर्नर रावेत मध्ये मा.नगरसेवक गणेश भोंडवे यांच्या माध्यमातुन दर शनिवारी आठवडे...

चंद्रभागा कॉर्नर रावेत मध्ये मा.नगरसेवक गणेश भोंडवे यांच्या माध्यमातुन दर शनिवारी आठवडे बाजाराचे आयोजन

123
0

रावेत,दि.30 जुलै 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना भाजीपाला मिळावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरातील किवळे-रावेत प्रभागांमध्ये आठवडी बाजारांचे आयोजन करण्यात येते आहे. चंद्रभागा काॅर्नर रावेत येथ दर शनिवारी आठवडी बाजार आज पासुन सुरू झाला आहे; मात्र हा बाजार थोडा वेगळा आहे. कारण हा बाजार शेतकरी आणि गृह उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आयोजित शेतकरी आठवडे बाजार माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांच्या पुढाकाराने हा आठवडी बाजार सुरू केला आहे. शनिवार 30 जुलै 2022 रोजी या आठवडी बाजाराचा शुभारंभ होत आहे. दर शनिवारी दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत हा बाजार भरणार आहे.

‘महिला आपल्या कुटुंबाची योग्य काळजी वाहतात आणि घरातील ज्येष्ठांना आणि मुलांना सकस आहार मिळावा याकडे त्यांचा कल असतो म्हणूनच मी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचा आठवडे बाजार सुरू करण्यावर भर दिला आणि आज माझ्या प्रभागात या आगळ्यावेगळ्या आठवडे बाजाराचे उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद होत आहे,’ असे मा.गणेश भोंडवे यांनी सांगितले.

‘महिलांनी रास्त दरात ताज्या भाज्या विकल्या तर या भागातील चोखंदळ नागरिक निश्चितच त्याला प्रतिसाद देतील आणि हा प्रयोग यशस्वी होईल’, असे सिद्धांत भोंडवे म्हणाले.
जास्तीत जास्त नागरिकांनी या आठवणी बाजाराचा लाभ घ्यावा या आठवडी बाजारात स्पेशल ऑफर देण्यात येत आहे.

Previous articleपुणे आणि भोर येथे बिजली महोत्सवाचे आयोजन ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीची नागरिकांना माहिती
Next articleखासदार, आमदारांना गोळा केलं, पण शिंदे एका गोत्यात फसले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + twenty =