किवळे-रावेत,दि.२६ जुन २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- युवा नेते श्री . दिपक मधुकर भोंडवे यांच्या संकल्पनेने व SUPERMIND bridging Education यांच्या सहकार्याने प्रभाग क्र-२४ विकासनगर किवळे,रावेत मामुर्डी संपुर्ण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. आयोजक दिपक मधुकर भोंडवें युवा नेते यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले,या वेळी दिपक भोंडवे बोलताना म्हणाले विद्यार्थी हा हूशार असतो.त्याला पालकांनी फक्त पुशअप करायची गरज असते. ओझे न टाकता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रत्येक गोष्टीत मनोरंजनात्मक पुढे जायला शिकवायचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा नक्कीच यशाचे शिखर गाठणार असे मत व्यक्त केले.मार्गदर्शक श्री . अनिल गुंजाळ सर माजी सहाय्यक आयुक्त ( शिक्षणाधिकारी ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि सौ . अचिंता मडके शैक्षणिक समुपदेशक व करिअर मार्गदर्शक,विश्वनिकेतन विद्यालय खोपोलीचे संदीप इनामदार,तसेच बालभारतीचे माझी संपादक डाॅ.राजगुरु सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम आज रविवार २६ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वा समीर लॉन्स , रावेत , पुणे येथे पार पडला.सदर कार्यक्रमास २३५ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला.यावेळी युवा मंचचे संतोष भोंडवे,गोपीचंद पवरा,श्रीकांत देशपांडे,गणेश वारे,संजय राठोड,निखील जाधव,सचिन गावडे,धनजय शुक्ला,सुनिल भोंडवे,रत्नाकर करकांल,पुष्पा किटाडीकर,श्रीकांत नवले आदी.पदाधिकारी उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी वर मार्गदर्शन वेळोवेळी होणे गरजचे-दिपक भोंडवे