Home ताज्या बातम्या किवळे-शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत…

किवळे-शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत…

0

किवळे,दि.१५ जुन २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड मनपा शाळा किवळे क्र. ९६ येथे आज १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा २ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात बौद्धिक, भावनिक, अंकज्ञान यावरील विविध खेळांचे स्टॉल शाळेतील शिक्षकांनी लावले होते. सर्व नवगतांचे स्वागत गुलाब पुष्प, चॉकलेट, खाऊ देऊन करण्यात आले.पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रमास पालिकेच्या शिल्पा गोखले ( उप अभियंता),माजी नगरसेविका संगीताताई भोंडवे,युवा नेते राजेंद्र तरस तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्याध्यापिका सौ.सुनंदा अस्वार यांनी मार्गदर्शन केले.शाळेच्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले.सर्व विद्यार्थी व पालकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते.

Previous articleप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण तर उपमुख्यमंञी अजित पवार यांना बोलु न दिल्याने अनेकांनी व्यक्त केली नाराजी
Next article७ हजारांहून अधिक गाणी लिहणार्‍या,पहाडी अवाजाचा बादशाह का. प्रतापसिंग बोदडे दादांना पिंपरी चिंचवड शहरात आनोखे राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 20 =