Home ताज्या बातम्या किवळे-बांधकाम साईटवर ढिगार्‍या खाली सापडुन एका कामगाराचा मृत्यु तर तीन जन जखमी

किवळे-बांधकाम साईटवर ढिगार्‍या खाली सापडुन एका कामगाराचा मृत्यु तर तीन जन जखमी

0

किवळे,दि.११ जुन २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-किवळे एक्सप्रेस हायवे लगत सिटी ऑन स्कायवे या बांधकाम साइटवर तीस फूट खड्ड्यामध्ये फुटिंगचा काम चालू असताना ४ लेबर स्टील बांधत होते वरून आचानक साइटच्या कडेची माती ढासळली लेबरच्या अंगावर ती पडली प्रसंगावधानाने बाहेर काढण्यात आले मात्र दोन लेबर ढिगर्‍या खालीच अडकून पडल्याने त्यांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले त्यातले दोन जखमी एक सुखरूप बचावला तर एक ढिगार्‍याखाली दबून एकाचा मृत्यू झाला घटनास्थळी देहूरोड आणि रावेत पोलीस दाखल झाले स्पाॅट पंचनामा व पुढील तपास पोलिस करीत आहेत तर त्या लेबर लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

संदिप अगरवाल बिल्डर यांची हि साईड असुन ते अजुन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत अनेक गोष्टीनवर चर्चा होत असुन सेफ्टी प्रिक्युशन कडे दुर्लक्ष असल्याचे पहावयास मिळते.याच साईडवर नाही तर अनेक बांधकाम साईडवर बिल्डर आणि टेकेदार यांची मनमानी कारभार चालु असतो त्यामुळे अनेक बांधकाम मजुर हे जीव मुठीत घेऊन काम करतात.बांधकाम मजुरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला.अशा धनदांडग्या बिल्डर आणि ठेकेदार यांना जरब बसला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − five =