Home ताज्या बातम्या मोठी कारवाही;रावेत बीआरटी रोडच्या लगत चे अनधिकृत बांधकामे हटवली

मोठी कारवाही;रावेत बीआरटी रोडच्या लगत चे अनधिकृत बांधकामे हटवली

0

रावेत,दि.७ जुन २०२२(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-अनेक अनधिकृत बांधकामे पञाशेड वर महापालिकेकडुन कारवाही करण्यात आली.‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बी.आर.टी.रोड रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर दि.०६ जुन २०२२ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये २ विट बांधकाम व पत्रा, ४२ पत्राशेड असे एकुण अंदाजे ७६६७.०० चौ.मी. (८२४९७.०० चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.


सदर कारवाई श्री. जितेंद्र वाघ, मा.अतिरिक्त आयुक्त(२), श्री. मकरंद निकम, मा. शहर अभियंता, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय घुबे कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली. सदर कारवाई श्री.अभिजित हराळे, क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग वश्री. दिपक करपे उप अभियंता, श्री.राजेंद्र डुंबरे उपअभियंता, श्री. प्रविण धुमाळ, श्री. रमेश जिंतीकर कनिष्ठ अभियंता, अ व ब प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-८ व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ०६ मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक, २१ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली. सदर कारवाई ७ जेसीबी तसेच १४ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.


सदर कारवाही ही १८ मे पासुन सुरु आहे.रावेत बीआरटी रोड ते नदी पञालगत भोंडवे काॅर्नर वाल्हेकर वाडी रोड सर्व अनधिकृत पञाशेड व बांधकामे काढणार आहेत.माञ शिंदे पेट्राॅल पंप ते इंद्रप्रभा सोसायटी मधील व्यावसायिक दुकाने आहेत.त्यापुढील सर्व दुकानदारांनी गाळ्याचा बाहेर अनधिकृत शेड बांधले आहे त्यात एका माजी नगरसेवकाचा कार्यालय आहे आहे ते सर्व,कधी काढणार असा प्रश्न जनतेतुन विचारला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version