पिंपरी-चिंचवड,दि.20 एप्रिल 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडचे सध्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे कृष्ण प्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कृष्णप्रकाश यांच्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे याचीही राज्याचे महिला अत्याचार प्रतिबंधक विभागामध्ये महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी आता अंकुश शिंदे पदभार घेणार आहेत. अंकुश शिंदे हे यापूर्वी सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर होते.आता पिंपरी चिंचवड शहरावर नवे पोलिस आयुक्त कशा प्रकारे अंकुश ठेवतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.