Home ताज्या बातम्या किवळे-आदर्श उपक्रम ; एक गाव एक शिवजंयती चे आयोजन सर्वाना सहभागी होण्याचे...

किवळे-आदर्श उपक्रम ; एक गाव एक शिवजंयती चे आयोजन सर्वाना सहभागी होण्याचे अव्हान

124
0

किवळे,दि.१६ मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-एकीकडे गावांगावांत विविध मंडळे एकमेकांच्या इर्षेवर उत्सव साजरे करीत असताना पिंपरी चिंचवड शहरातील किवळेगाव (ता.हवेली,जि.पुणे) येथे एक मंडळ, एकच उत्सव आणि इतर मंडळांचे त्याला सहकार्य असा आदर्शवत निर्णय राबविला जात आहे. गावातील अनेक मंडळांच्या या आदर्श उपक्रमामुळे ‘एक गाव एकच शिवजंयती’ अशी नवी संकल्पना रुढ झाली आहे.उत्साहात आणि जल्लोषात झालेला शिवजयंती उत्सवही परंपरेने अखिल किवळेगाव शिवजंयती महोत्सव समितीने साजरा केला तर इतर मंडळांनी त्यामध्ये हिरीरीने सहभागी होवून उत्सवाची शोभा वाढविली. गेली ५वर्षा पासुन या गावात अशाप्रकारची उत्सव परंपरा आहे.असाच यंदाचा हि उत्सव होणार आहे.अखिल किवळेगाव शिवजंयती महोत्सव समितीने प्रजेचा विकास ला दिली.श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३९२व्या जयंती निमित्त शिव जन्मोत्सव सोहळा पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना नदीच्या काठावर असणार्‍या किवळे गाव येथे एक गाव एक शिवजयंती चे आयोजन,सालाबादप्रमाणे या वर्षी तिथी प्रमाणे फाल्गुन कृ . २/४ , शके १ ९ ४३ , सोमवार दि . २४ मार्च २०२२ रोजी अखिल किवळेगाव शिवजयंती महोत्सव २०२२ किवळे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केले आहे .

कार्यक्रमाची रूपरेषा

१९/०३/२०२२ सायं.६ वा. वक्तृत्व स्पर्धा ( वयोगट : ८ ते १२ व १३ ते १६ )विषयानुसार ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून
दि .१९/०३/२०२२ रोजी सायं .६ वा . संपर्क ७७०९२५९४३५ / ९८८१६१२०१६ या क्रमांकावर पाठविणे

दि.२०/०३/२००२२ रोजी सकाळी १०.००वा- निबंध स्पर्धा ( वयोगट : ८ ते १२ व १३ ते १६ ) स्थळ : श्री बापदेव महाराज लॉन्स , किवळे या ठिकाणी होणार,अधिक माहिती साठी संपर्क ७७०९ २५ ९ ४३५ / ९ ८८१६१२०१६

दि.२०/०३/२०२२ रोजी सायं . ६ ते ८ वा. महाराष्ट्राची शौर्य गाथा- सादरकर्ते किल्ले अभ्यास समिती किवळे गाव प्रसिद्ध युवा व बालशाहीर ( स्थळ मुकाई चौक , किवळे ) यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम मुकाई चौक येथे होणार आहे.

दि.२०/०३/२०२२ रोजी सायं८ ते १० शिवचरित्र व्याख्यान – ह.भ.प.मोहन महाराज शेलार चे मुकाई चोक , किवळे येथे होईल.

दि.२०/०३/२०२२ रोजी राञी ९.०० वा. ज्योत आण्यासाठी तुंगी ( मावळ ) गडाकडे मुकाई चौक येथुन प्रस्थान होणार.
दि.२१/०३/२०२२ रोजी सकाळी ९ .०० वा . शिवज्योत आगमन व मुकाई चौक येथे स्वागत

दि.२१/०३/२०२२ रोजी सकाळी.९.३० वा. श्रींचा अभिषेक -३९२ दामपत्यांच्या ( जोडया ) व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते.

दि.२१/०३/२०२२ सकाळी १०.०० वा . भव्य रक्तदान शिबीर , स्वच्छता अभियान व वृक्षारोपन समारंभ तिन ठिकाणी मुकाई चौक, किवळेगांव व श्री बापदेव महाराज मंदिरा मागे होईल

दि.२१/०३/२०२२ रोजी सायं . ५.०० वा .आरती , विकासनगर येथे उपस्थित महिलांच्या शुभहस्ते व ढोल ताश्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक सुरुवात
७.३० वा.आरतीं , मुकाई चौक येथे उपस्थित महिलांच्या शुभहस्ते

दि.२१/०३/२०२२ रोजी रात्री १०.०० वा . कार्यक्रमाचा समारोप आरती , किवळे गावठाण येथे उपस्थित महिलांच्या शुभहस्ते व त्यानंतर महाप्रसाद (भोजनदान)

या वर्षी प्रमुख आकर्षणभव्य १२ फुटी सिंहसनावरील छत्रपति शिवाजी महाराजांची नेत्रदेयक मुर्ती , विद्यार्थी संघ / वैष्णव दिंडी सोहळा टाळकरी ( काशिनाथ महाराज ) आळंदी, घोडे व त्यांच्यावर स्वार मावळे, शिवाज्ञा / शंखनाद ढोल ताशा व ध्वज पथक, शिवकालीन योद्ध कला , मर्दानी खेळ , तलवारबाजी दांडपट्टा,शुभम ऑडीओ व श्री लाईटस् ( लेझर व लाईट शो ) असणार आहे.
मिरवणुकीचा मार्ग -नेटके चौक ( विकासनगर ), शिंदे पेट्रोल पंप, माळवाले नगर मुकाई चौक, किवळे गावठाण येथे मिरवणुकीची सांगता होईल.
अखिल किवळेगाव शिवजन्मोत्सव समिती ने सर्वांना सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.या वर्षी शिवशक्ती मित्र मंडळ ( किवळे गावठाण ) , सार्वजनिक मित्र मंडळ , सिद्धविनायक मित्र मंडळ , मराठा मित्र मंडळ , शिवसाम्राज्य प्रतिष्ठाण , राजे प्रतिष्ठाण , त्रिशुल मित्र मंडळ , बापदेव मित्र मंडळ ट्रस्ट , शिवसंदेश मित्र मंडळ ट्रस्ट , सोमेश्वर मित्र मंडळ , मोरया प्रतिष्ठाण , अष्टविनायक मित्र मंडळ , सिद्धीविनायक मित्र मंडळ ( दत्तनगर ) , गुरूदत्त प्रतिष्ठाण , मक्रांत मित्र मंडळ ( विकासनगर ) , त्रिशुल मित्र मंडळ ( विकासनगर ) , शिव प्रतिष्ठाण मित्र मंडळ , जागृत मित्र मंडळ , अष्टविनायक मित्र मंडळ ( तरस वस्ती ) , शिवशाही मित्र मंडळ , हनुमान तरूण मित्र मंडळ , दुर्गादेवी उत्सव प्रतिष्ठाण , श्री शिवछत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट , श्री मित्र मंडळ , औदुंबर मित्र मंडळ , विघ्नहर्ता मित्र मंडळ , यंगस्टार मित्र मंडळ , क्रांती मित्र मंडळ , हनुमान मित्र मंडळ ( प्रगती कॉलनी ) , भारतरत्न सोसायटी , श्रीकृष्ण मित्र मंडळ , यंगस्टार स्पोटर्स क्लब , शिवरत्न मित्र मंडळ , महाराजा सुप , सरकार ग्रुप , सुदर्शन मित्र मंडळ , पंचशिल मित्र मंडळ , राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण , समस्त किवळे ग्रामस्थ व सर्व शिवभक्त सहभागी आहेत.

Previous articleअखेर प्रभागरचना रद्द ; निवडणुका लांबणीवर
Next articleकाश्मिरी पंडितांना न्याय महाराष्ट्रानं दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 11 =