Home ताज्या बातम्या सुवर्ण संधी- बेरोजगार तरुण-तरुणींना संधी; रावेतमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन

सुवर्ण संधी- बेरोजगार तरुण-तरुणींना संधी; रावेतमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन

101
0

रावेत,दि.१० मार्च २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. रावेत येथील दिपक मधुकर भोंडवे युवा मंचच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुकर भोंडवे यांनी दिली.

देहूरोड-कात्रज हायवेवरील रावेतच्या समीर लाॅन्समध्ये रविवार (दि.13 मार्च) रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत नोकरी महोत्सव घेण्यात आला आहे. या महोत्सवात 25 ते 30 नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फायन्सान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बॅंकिंग, इन्शुरन्स, हाॅस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकाॅम व इतर आय.टी., बी.पी.ओ., के.पी.ओ., फार्मा अशा क्षेत्रात युवक-युवतींना संधी मिळेल.

याकरिता युवक-युवतींनी स्वताःचा बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईट फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी प्रत्येकी पाच प्रती सोबत आणावीत, तसेच आठवी ते दहावी, बारावी, बी.ए., एम.ए., एम.काॅम., बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए., आय.टी.आय., बी.ई., अशा आॅल फॅकल्टीतील डिप्लोमा, सिव्हिल, पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांनी नोकरी महोत्सवाचा आवश्यक लाभ घ्यावा, असेही आवाहन भोंडवे यांनी केले आहे.

 

Previous articleती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज – डॉ. भारती चव्हाण
Next articleयूपी निवडणूक निकाल २०२२: योगी फक्त यूपीसाठी उपयुक्त, सपा पुन्हा भगव्या लाटेत; बसपाच्या अस्तित्वावर संकट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 2 =