Home ताज्या बातम्या स्व . शंकर ( आण्णा ) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला विजयी करा.-...

स्व . शंकर ( आण्णा ) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला विजयी करा.- पॅनलप्रमुख शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे

105
0

पिंपरी,दि.२२ फेब्रुवारी २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची स्थापना सर्व कर्मचार्‍यांचे संघटीत प्रश्न सोडविणे , कामगारांना चांगल्या प्रकारचे जीवनमान देणेकामी प्रशासनाकडून चांगल्या सोयी – सुविधा उपलब्ध करुन घेणे इत्यादी कामी सन २००२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही कामगार संघटना मान्यताप्राप्त झाली असुन स्व . शंकर ( आण्णा ) गावडे , शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे , मनोज माछरे , दिपक गळीतकर , हनुमंत लांडगे , पद्मा कांबळे आदी अभ्यास व अनुभवी व्यक्तींमुळे आज अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा – उदा : मनपा कर्मचाऱ्यांना वेळोवळी ५ वा वेतन आयोग , १० टक्के वेगळी व जादा वेतन , ५ व्या वेतन आयोगास समकक्ष ६ वा वेतन आयोग , मनपा कर्मचाऱ्यांकरीता ना नफा ना तोटा या तत्वावर महासंघ मेडिकल्सची स्थापना , अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता कॅशलेस धन्वंतरी स्वास्थ्य योजना , मनपा कर्मचाऱ्यांकरीता स्व . शंकर ( आण्णा ) गावडे स्मृती कामगार भवनाची उभारणी इत्यादी कामे अत्यंत प्रभावीपणे साकारलेली आहेत . शुक्रवार दिनांक २५/०२/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची सन २०२२-२०२४ या कालावधीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणुक पार पाडण्यात येणार आहे . सदर निवडणुकीमध्ये स्व . शंकर ( आण्णा ) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे पॅनलप्रमुख श्री . शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे हे अध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवित आहेत . दिनांक ११/०१/२०२० रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक झाली होती . सदर निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांच्या फरकाने स्व . शंकर ( आण्णा ) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवास सामोरे जावे लागले . परंतु गेल्या २ वर्षांत सदर पराभवाचा फटका मनपा कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला आहे . वास्तविक माहे जुन – २०१ ९ मध्ये सातवा वेतन आयोग शासन मंजुरीकामी पाठविला असता निवडणुकीच्या तोंडावर तो चुकीच्या पद्धतीने मंजूर करून घेतला व त्याचा नाहक परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला . त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे . ७ व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी दुर्लक्षीत केली असुन कर्मचाऱ्यांचे ते भत्ते वाढवून देणेकामी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे . तसेच सन २००५ नंतर मनपा सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनामार्फत नविन परिभाषीत अंशदान पेन्शन योजना लागु करणेत आली आहे . सदर पेन्शन योजना बंद करून पुर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत दिनांक १ ९ / ०२ / २०१९ रोजी मा . महापालिका महासभेची मान्यता घेतली असुन सन २००५ नंतर मनपा सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना पुर्वीची जुनी पेन्शन योजना लागु करणेकामी माहे जुन – २०१९ रोजी मा.आयुक्तांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेत आला आहे . या प्रस्तावाबाबत ७ वा वेतन आयोगाच्या शासनाकडील प्रस्तावामध्ये सुद्धा मंजुरी मिळणेकामीचा विषय घेण्यात आला आहे .

तसेच मनपा कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता बदलल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . सदरचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध राहणार आहोत . तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लाड कमिटी शिफारशी पुर्ववत लागु करणेसंबंधी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करणार आहोत . यामध्ये गरज भासल्यास राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे कारण हा प्रश्न फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाच नुसन महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका नगरपालिका , स्थानिक संस्थांचा आहे . तसेच स्व . शंकर ( आण्णा ) गावडे स्मृती भवनाच्या बांधकामामध्ये श्री . शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत त्याबाबत कोणतेही आरोप ते सिद्ध करु शकलेले नाहीत . सदरचे बांधकाम ते ज्या दराने करुन घेणार होते त्यात ते अपयशी ठरले असुन बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारची बदल / दुरुस्ती करणेत आलेले आहे त्याबाबत कायदेशीर पुरावे अद्याप सादर करण्यात आलेले नाही . तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सतत दिशाभुल करण्याचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु आहे . मनपामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राथमिक शिक्षकांसाठी वैद्यकीय उपचारांची सेवा देणेकामी आम्ही कटीबद्ध असुन मागील २ वर्षांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न प्राधान्याने करणार आहोत आपण सर्व कर्मचारी आपण पॅनलला निवडुन द्यावे.अशी माहीती पञकार परिषदेत पॅनल प्रमुख स्व.शंकर(आण्णा) गावडे कर्मचारी महासंघाचे शंशीकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी दिली.यावेळी पॅनलचे उमेदवा मनोज प्रितमसिंग माच्छारे(उपाध्यक्ष),महादेव तुकाराम बोञे(उपाध्यक्ष),सविता निवृत्ती निगडे(उपाध्यक्ष),अभिमान अरुण भोसले(उपाध्यक्ष),मंगेश पोपट कलापुरे(चिटणीस),उमेश बाळासाहेब बांदल(सहसचिव),नितीन संपत समगिर(कोषापाल),शुभांगी शंशीकांत चव्हाण(संघटक),दिंगबर हरिभाऊ चिंचवडे(प्रमुख संघटक),नंदकुमार पोपट इंदलकर(कार्यकारणी सदस्य),अमित ईश्वर सारसर(कार्यकारणी सदस्य),तुषार चिंधु कस्पटे(कार्यकारणी सदस्य),संजीव प्रल्हाद राक्षे(कार्यकारणी सदस्य),लाला तुकाराम गाडे(कार्यकारणी सदस्य),सुरज कृष्णा टिंगरे(कार्यकारणी सदस्य),विजेंद्र लालचंद आठवाल(कार्यकारणी सदस्य),धर्मेंद्र तुकाराम शिंदे(कार्यकारणी सदस्य),चंद्रशेखर शंकर गावडे(कार्यकारणी सदस्य),दत्ताञय विठ्ठल ढगे(कार्यकारणी सदस्य),संजय किसन कापसे(कार्यकारणी सदस्य),माया गोविंद वाकडे(कार्यकारणी सदस्य),आण्णासो सोपान वाघोले(कार्यकारणी सदस्य),प्रमोद वंसतराव अंबपकर(कार्यकारणी सदस्य),विशाल विनायक बाणेकर(कार्यकारणी सदस्य) आदी कर्मचारी संघाचे सभासद उपस्थित होते.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड-किल्ल्यांचा विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleतुमच्याविरुद्ध खोटी FIR(तक्रार) दाखल झाली तर काय कराल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + fifteen =