Home ताज्या बातम्या AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॅ.असदुद्दीन ओवैसी यांचावर झालेल्या गोळीबाराचा निषेर्धात पिंपरी चिंचवड...

AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॅ.असदुद्दीन ओवैसी यांचावर झालेल्या गोळीबाराचा निषेर्धात पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले

112
0

पिंपरी,दि.04 फेब्रुवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- इंडिया मजलिस ए इतेहाद्दूल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे मेरठ-उत्तर प्रदेश येथील जनसभा करून दिल्लीला जात असताना काही भ्याड हल्लेखोरांनी ओवैसी साहेब यांच्या गाडीवर 4 राउंड (गोळ्या) फायर केल्या आहेत या हल्ल्यातून ओविसी हे सुखरूप बचावले आहेत पण या मारेकरी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी यासाठी या घटनेचा AIMIM पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,पिंपरी येथे AIMIM पक्ष प्रदेश महासचिव अकीलभाई मुजावर ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या नेतृत्वात खाली (दि.4) शुक्रवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरवात करण्यात आली व जोरदार घोषणा बाजी करत मोदी सरकराचा निषेध करण्यात आला,जोरदार निदर्शने करण्यात आले.यावेळी एम आय एम नेते शफिउल्ला काझी ,अब्दुल रोफ कुरेशी ,युवा नेते खालिद मुजावर ,पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख , महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख ,महासचिव मौलाना अब्दुल शंकर खान ,अर्चना परब, करीम खान , अरिफ मणियार ,संपर्क प्रमुख शब्बीर शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे ,सचिव फिरोज तांबोळी , भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अकिब शेख ,एम आय एम रिक्षा चालक संघटना जिल्हाध्यक्ष बाबा सय्यद ,मेहमूद शेख ,राहील खान ,नेते नियाज देसाई ,नेते मोहतसेंन सिद्दीकी ,वसीम तांबोळी ,असिफ तांबोळी ,समीर तांबोळी , आकाश फवारी ,जमालुद्दीन शेख , ,मौलाना मोईन मुलांनी , गाझी शेख इतर पदाधिकारी सदस्य व स्थानिक नागरिक महिला उपस्थित होते.

Previous articleविश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकार आणि संपादक का व्हावे लागले.
Next articleलता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × five =