Home ताज्या बातम्या खासदार श्रीरंग बारणेंनी शहरात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्याचे आश्वास बाबा कांबळे यांच्या...

खासदार श्रीरंग बारणेंनी शहरात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्याचे आश्वास बाबा कांबळे यांच्या शिष्टमंडळला दिले.

0

पिंपरी,दि.20 जानेवारी 2022 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड शहरात राजमाता जिजाऊंचा भव्य पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनी कष्टकरी जनता आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. कष्टकरी जनता आघाडीचे नेते बाबा कांबळे व त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार बारणे यांची भेट घेतली होती. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी केली. या वेळी करण्यात आली त्यावेळी खा.बारणेनकडुन आश्वासन देण्यात आल्याची माहिती बाबा कांबळे यांनी पञकारांना दिली.

या वेळी मराठा सेवा समितीचे अध्यक्ष सदाशिव तळेकर,महाराष्ट्र मजूर पक्षाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडगळे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.बाबा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवू, व असेच समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा पिंपरी चिंचवड शहरात उभाराव अशी आमची आग्रही मागणी आहे.

कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी केली. महात्मा फुले पुतळा परिसरात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने लढा देत आहोतच. या लढ्याची मूळ प्रेरणा ही राजमाता जिजाऊ पासून आम्ही घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाला आमच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील. तसेच पिंपरी चिंचवड शहरात राजमाता जिजाऊ यांचा कुठेही पुतळा नाही. समस्त बहुजनांची प्रेरणा असणाऱ्या जिजाऊंचा पुतळा शहरात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Previous articleदेहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणूकीत राष्र्टवादीची एक हाती सत्ता.
Next article‘कोविडमुक्त गाव’ अभियान पुणे विभागातही राबवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 − three =