Home ताज्या बातम्या महापालिकेत “हे” काय चाललय ? महिलांना छेडणारा “वळु” अजुन मोकाटच

महापालिकेत “हे” काय चाललय ? महिलांना छेडणारा “वळु” अजुन मोकाटच

0

पिंपरी,दि.16 डिसेंबर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- लोकशाहीच्या अधिकाराचा कोण कसा गैरवापर करेल सांगता येत नाही.त्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका अपवाद नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेत कामानिमित्त अनेक प्रकारचे नागरिक येतात.काही हौसे,नवसे तर काही “गवसे” ही येतात.असाच एक “वळु” पिंपरी महापालिकेत गेली अनेक वर्षांपासून येत असून सदरील “वळु” ने पिंपरी महापालिकेच्या एका विभागातील तब्बल 30 तरुण महिलांना त्रास दिला.सदरील महिलांनी त्यांच्या विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार दिली.सदरील प्रकरण “महिलांच्या तक्रारींचे निवारण करणाऱ्या “विशाखा” समितीकडे गेले.दरम्यान काही व्यक्तींनी मध्यस्ती करून प्रकरण थांबविले.त्यामुळे “वळु” अजुन मोकाटच आहे,मात्र आता पुन्हा त्याला लहर आली असून महिलांना “तू असे कपडे का घालतेस?, अशी का बसतेस? असे प्रश्न विचारून त्रास देत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.त्यामुळे महापालिकेत कामाला असणाऱ्या महिलांना त्रास देणाऱ्या “वळु” वर कधी कारवाई होणार याबाबत चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =