Home ताज्या बातम्या आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या पुढे किरीट सौमय्यांना शिवसेना विरोध...

आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या पुढे किरीट सौमय्यांना शिवसेना विरोध करणार का ?

0

पिंपरी,दि.२० नोव्हेंबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- उद्या दिवसभर पिंपरी चिंचवड शहरात भाजपचे माजी खासदार डाॅ.किरीट सोमैया हे शहरात असणार आहेत.ते दुपारी १२.००वा.नगरसेवक,पदाधिकारी,शक्तीकेंद्र प्रमुख,बुथप्रमुख,कार्यकर्ते यांच्याशी पिंपरी चिंचवड भाजपा मध्यवर्ती कार्यालयात संवाद साधणार आहेत,त्यानंतर पञकारांशी संवाद साधणार आहेत.माञ शिवसेनेने स्मार्ट सिटी च्या घोटाळ्याबाबत किरीट सोमैया यांना २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पञ देण्यासाठी महापौर दालना समोर अंदोलन केले होते.त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किरिट सोमैय्या यांच्या चेहर्‍याचे मास्क लावुन तोतञ्या अवाजात बोलुन सोमैय्या यांची टिंगल उडवत किरीट सौमय्या हिमंत दाखवा चौकशी करा,अशा घोषणा दिल्या माञ आता शिवसेना त्याच किरीट सोमैय्यानां त्याच अंदोलनातील पञ देण्याची हिम्मंत दाखवणार का? संपुर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनला असुन आमदार लक्ष्मण जगताप व आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांची शहरातील ताकत पहता त्यांच्या समोर किरीट सोमैय्यांना पञ देतील का ? की किरीट सोमैय्या काही नवीन प्रकरण काडतील यावर सर्वांचे लक्ष लागुन आहेत.

Previous articleप्राधिकरणवासीयांना आमदार महेश लांडगे यांचे “दिवाळी गिफ्ट’; सदनिका हस्तांतरण शुल्क आकारणी रद्द करण्याचा निर्णय
Next articleराहुल इंटरनॅशनल स्कूल ची पुण्यातील पहिली हिंजवडी येथे सीबीएसई आणि आयजी शाळा सुरु..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − eleven =