Home ताज्या बातम्या पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून...

पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून लावा आयुक्त राजेश पाटील साहेब – रमेश वाघेरे

0

पुनावळे,दि.१८ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे येथे २० वर्षापूर्वी कचरा डेपोचे आरक्षण टाकून काही बिल्डर व राजकारणी लोकांनी पुनावळे व आजूबाजूच्या गावांचे जमिनीचे भाव पाडले . त्यानंतर याच बिल्डरांनी व राजकारणी लोकांनी हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली . त्यानंतर प्रशासनाला हाताशी धरून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास २० वर्षे विलंब केला . त्यामुळे आयुक्त राजेश पाटील साहेब आपण अशा बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून उधळून लावा . मोशी कचरा डेपोची क्षमता संपली आहे . पुनावळे येथे ७४ एकर वनखात्याची जमिनीवर कचरा डेपोचे आरक्षण आहे . या जमिनीच्या मोबदल्यात शासनाला अंदाजे ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत . तसेच पिंपरी संडास येथे वनविभागाला पर्यायी जागा देण्याचे निश्चित झाले आहे . त्यामुळे आयुक्तसाहेब आपण लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून हि ७४ एकर जागा ताब्यात घ्यावी . २० वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे जे आयुक्त होऊन गेले ते हि जागा ताब्यात घेवू शकले नाही . परंतु आयुक्त साहेब आपली काम करण्याची क्षमता व अंदाज पासून आपण हि पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून लावावा,अशी मागणी रमेश नानासाहेब वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांना पञाद्वारे केली आहे.आयुक्त राजेश पाटील या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे

Previous articleडॉ. भारती चव्हाण यांची ‘नीडको’ च्या पश्चिम भारत सल्लागार संचालक पदावर नियुक्ती
Next articleजे राष्ट्रवादीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना जमलं नाही ते भाजपचे नगरसेवक तुषार कामटे यांनी करून दाखवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 4 =