Home ताज्या बातम्या स्वप्निल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष...

स्वप्निल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठवले) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष होणार

0

पिंपरी,दि.०७ ऑक्टोबर २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड शहरातील अभ्यासू संयमी असे उद्योजक स्वप्निल कांबळे हे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे सक्रीय सभासदांच्या मतदानावर निवडणूक होणार आहे. लोकशाही पद्धतीने मतदान होणार असून सक्रिय सभासद हे स्वप्निल कांबळे यांना भेटीसाठी बोलवत आहेत. स्वप्निल कांबळे हे शहराध्यक्ष झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरात रिपब्लिकन पक्षात तरुणांची इनकमिंग वाढेल आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जुनेजाणते सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे स्वप्निल कांबळे यांचा प्रचार करत असून प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत व त्यांच्याशी चर्चा करून स्वप्निल कांबळे हे शहराध्यक्ष म्हणून कसे योग्य आहेत यासाठी झटत आहेत. अध्यक्षपदाच्या यादी मध्ये स्वप्निल कांबळे हे नाव जरी नवखे वाटत असल तरी स्वप्निल कांबळे हे त्यांचे वडील दादाराव कांबळे पॅंथर पासून आठवले साहेबांसोबत काम करत होते तेव्हापासून स्वप्निल कांबळे हे वडिलांच्या मागे प्रत्येक आंदोलनात व पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी असत त्यामुळे तरुणांमध्ये स्वप्निल कांबळे नावाची एक क्रेझ वाढत आहे.स्वप्निल कांबळे यांना बिनविरोध अध्यक्ष करायला हवं होतं अशी चर्चा सर्वांच्या मनात असली तरी स्वप्निल कांबळे यांना आम्ही मतदानातून निवडून आणू असा विश्वास रिपब्लिकन मतदारांनी दाखवला आहे. स्वप्निल कांबळे उद्योजक असले तरी पक्षाला वेळ देतात. आदरणीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार असुन जरी निवडणूक झाली तरी कोणी माझे विरोधक नाही सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आहे असा विचार करून स्वप्निल कांबळे मैत्रीपूर्ण निवडणूक लढत देत आहेत. त्यामुळे सर्वांच्या मनात स्वप्निल कांबळे घर करत असून पक्षामध्ये नक्कीच नवीन मोठा बदल होईल असा विश्वास अशी चर्चा मतदारांमध्ये आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे

तसेच सर्व मतदारांमध्ये स्वप्निल कांबळे निवडणुकीत उभी असल्याने आनंदाचे वातावरण आहे स्वप्निल कांबळे यांनी सर्व मतदारांना त्यांना मतदान करून निवडून आणावे असे आव्हान केले आहे तसेच सर्वत्र प्रचारासाठी सर्व प्रभागांमध्ये सक्रिय पक्षाच्या सदस्यांना मतदारांची भेटी घेत आहेत.

शहराध्यक्ष निवडणूक = २०२१ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा,भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षाची लोकशाही पद्धतीने निवडणूक शहराध्यक्ष पदासाठी होत आहे .

या प्रक्रियेमध्ये स्वप्नील दादाराव कांबळे शहराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत,त्यांचे निवडणूक चिन्ह कपबशी आहे . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री पँथर नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या समवेत स्वप्निल कांबळे यांचे वडील दादाराव गुलाब कांबळे पँथर पासून सक्रिय चळवळीत सहभागी आहेत . स्वप्निल यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले असून लांडेवाडी भोसरी याठिकाणी रहावयास आहे , तेथील पक्षाच्या शाखेमध्ये त्यांचे बालपण गेले आहे . व्यवसायाने एस . के . ग्रुपच्या माध्यमातून सिक्युरिटी आणि मॅनपावर सप्लायर्स कंपनीचा मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यक्रम , आंदोलनात कांबळेचा सहभाग असतो . सन्मानीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळावा घेण्यात स्वप्निल कांबळे चा सक्रिय सहभाग होता . आदरणीय नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळे व शहरातील वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षवाढीसाठी क्रियाशील व प्राथमिक सदस्यांची सभासद नोंदणी मोहीम राबवून पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करित आहेत. शहराध्यक्षपद मिळाल्यानंतर रिपब्लिकन बेरोजगार तरूणांना व महिलांना रोजगार उपलब्ध करण्यसाठी प्रयत्नशील राहणार आहेत. रविवार दि . १०/१०/२०२१ रोजी सकाळी १० ते सायं . ५ पर्यंत होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करावे.
निशाणी चिन्ह कपबशी समोर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे अहवान स्वप्निल कांबळे सर्थक व मिञपरिवार करत आहेत शहराध्यक्षनिवडणुक ठिकाण अल्फाईन हॉटेल , डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या मागे , पिंपरी – १८ येथे मतदान होणार आहे.

Previous articleविद्यार्थी भारती करणार राष्ट्रीय बालिका हक्क परिषद… बालदिनाचे निमित्त साधून काढणार बालिकांच्या प्रश्नावर प्रकाश पडणारा बॅटरी मोर्चा
Next articleमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरावृत्ती होईल – संजोग वाघेरे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 12 =