Home ताज्या बातम्या अवैध देशी फॅक्र्टीमेड पिस्टल बाळगणा-या दोन आरोपींना देहुरोड पोलीसांनी पकडले.

अवैध देशी फॅक्र्टीमेड पिस्टल बाळगणा-या दोन आरोपींना देहुरोड पोलीसांनी पकडले.

94
0

देहुरोड,दि.30 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुरोड पोलीस ठाणेचे मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सोंडे यांना त्यांच्या बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, एक इसम त्याचा ताब्यात बंदुक आहे तो ती घेवुन साईनगर, मामुर्डी भागात संशस्पद फिरत आहे. अशी बातमी मिळाताच त्यांनी लगेच तपास पथकाचे सपोनि प्रसाद गज्जेवार व इतर अमलदार यांना सांगितली त्यावरुन तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी साईनगर, मामुर्डी भागात पेट्रोलिंग करुन साईगर, मामुर्डी पाण्याच्या टाकीखाली असलेल्या मोकळ्या जागेतुन अरोपी नामे अमोल अशोक कालेकर, वय २५ वर्षे, राहणार मु काले, पो. पवनानगर, ता मावळ, जि. पुणे. यांना ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती घेतली तर अरोपी कडे एक 40000/- रुपये किंमतीची देशी बनावटीची फैक्ट्री मेड पिस्टल व 1000/- रुपये किंमतीचा एक जिवंत काडतुस जप्त केले सदर घडलेल्या प्रकारावरुन पोना/1003 दादासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्‍यादी वरुन देहुरोड पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा रजि क्रमांक 818/2020 भारतीय हत्यार कायदा कलम सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक काडतुस जवळ असुन आणखी काडतुसांच्या शोधात फिरत असताना देहुरोड शहरात आढळुन आले.गुन्हयाचा पुढील तपास पथकाचे स.पो.नि प्रसाद गज्जेवार यांनी सुरु केला प्राथमीक तपासात अरोपीने सांगितले की मुळशीतील काही जणांसोबत भांडणे झाली असुन स्वताच्या बचावा साठी घेऊन फिरत आहे.पुढील चौकशी अंती सर्व प्रकार काय आहे हे तपासले जाईल अरोपीस अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे (अग्निशस्त्र) गावठी पिस्टल हे इसम नाम अमोल ज्ञानेश्वर दळवी, रा. मु, कोर्थुणे,पो. पवनानगर, ता.मावळ जि. पुणे या कडुन घेतल्याचे सांगितल्याने सदर व्यक्तीचा शोध घेवुन अरोपी अमोल दळवीला ताब्यात घेतले त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने आणखी एक (अग्निशास्त्र )फॅक्र्टी मेड  पिस्टल व दोन जिवंत काडतुस दिली. अशा प्रकारे आरोपी अमोल अशोक कालेकर व अमोल ज्ञानेश्वर दळवी यांच्याकडुन प्रत्येकी एक असे एकूण दोन 80000/- रूपये किंमतीचे दोन देशी बनावटीच फैक्ट्री मेड पिस्टल व 3000/- किंमतीचे तिन जिवंत काडतुस, मोबाईल फोन व मोटार सायकल असा एकूण रक्कम रुपये 1,23,000/- चा माल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री कृष्ण प्रकाश सो, अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ श्री आनंद भोईटे सो. देहुरोड विभागाचे सहा पोलीस आयुक्त श्री संजय नाईक पाटील सो, तसेच देहुरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास सोंडे सो, याचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि प्रसाद गज्जेवार, पो हवा.शाम शिंदे, पोना. दादा जगताप, पोना. प्रशांत पवार,पोना.कुरणे,पोशि. सुमित मोरे,पोशि. सचिन शेजाळ, पोशि.दिपक शिरसाठ, पोशि.संकेत घारे, पोशि. विजय गैंगजे यांनी केली आहे. पुढील तपास देहुरोड पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार हे करीत आहेत.

Previous articleपुणे जिल्ह्यात सलग 4 दिवस ‘ड्राय डे’ 3 डिसेंबर पर्यंत
Next articleधक्कादायक प्रकार ! बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटेची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × two =