Home ताज्या बातम्या मा.राज्यमंत्री संजय भेगडे यांना २०१४ -२०१९ मधील केलेल्या विकासकामांची विस्तृतपणे माहिती आमदार...

मा.राज्यमंत्री संजय भेगडे यांना २०१४ -२०१९ मधील केलेल्या विकासकामांची विस्तृतपणे माहिती आमदार सुनील शेळकेंनी मागवल्याने मावळात चर्चेला उधाण

0

तळेगाव दाभाडे दि.७ नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माजी राज्यमंञी- आमदार संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांनी २०१९ रोजी अनेक ठिकाणी कामाचे वचन पुर्तीचे फलक लावले होते माञ देहुरोड उड्डाण पुल ते कामशेत उड्डाण पुल असा अनेक कामाची चर्चा निवडणुकी पुर्वी होती.माञ निवडणुकी पुर्वी आणि आता विकासकामांच्या निधीच्या आकडेवारीत फरक दिसुन आल्याने मावळचे आताचे आमदार सुनिल शेळके यांनी थेट माजी आमदार संजय भेगडे यांच्या कडुन पञाद्वारे केलेल्या विकास कामाचा अहवाल व निधी ची आकडेवारी मागवली.

सन २०१४ – १९ या कार्यकाळातील १६४२ कोटी ९२ लक्ष रुपयांच्या विकासनिधीची सविस्तरपणे माहिती उपलब्ध करुन द्यावी. माजी राज्यमंत्री भेगडे यांनी सविस्तरपणे माहिती दिल्यावर अभ्यास करता येईल, जनतेची दिशाभूल थांबेल,असे आमदार शेळके म्हटले आहे.

मागील आठवड्यापासून आमदार सुनिल शेळके हे माजी राज्यमंत्री भेगडे यांना भेटून पत्र देण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर शनिवार (दि.७) सकाळी माजी राज्यमंत्री भेगडे यांच्या निवासस्थानी स्विय सहाय्यकांनी पत्र स्वीकारले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले की, रविवार (दि.१) नोव्हेंबर रोजी सन २०१४ ते २०१९ या आपल्या कार्यकाळातील मंजुर व उपलब्ध केलेल्या विकासकामांच्या शीर्षकासह निधीची आकडेवारी लेखी स्वरुपात दिली. सदरहू माहिती यापूर्वीच आपण निवडणुकीच्या काळात जाहीर केल्याने सर्वश्रुत आहे. मी या विकासकामांची माहिती संबंधित शासकीय विभागाकडून गेल्या ६ महिन्यांपासून प्राप्त करीत आहे. परंतु मला प्राप्त झालेली आकडेवारी व आपण प्रसिद्ध केलेल्या निधीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी १४०० कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्याचे आपण सांगितले असताना आता १६४२ कोटी ९२ लक्ष रुपयांची आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यातच शासकीय अधिकारी व आपल्या आकडेवारीतील तफावतीमुळे तालुक्यातील जनतेमध्ये साशंकता निर्माण झालेली आहे.
तरी आपण प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक शीर्षकाअंतर्गत गावनिहाय व कामनिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून तालुक्याच्या विकासाचा अभ्यास करणे सोयीस्कर होईल. तसेच आपण सांगितल्याप्रमाणे जी १०० कोटी रुपयांची विकासकामे रखडलेली आहेत. त्या कामांची देखील शीर्षकासह गावनिहाय व कामनिहाय विस्तृत माहिती उपलब्ध व्हावी. तसेच तळेगाव – चाकण हा राष्ट्रीयमार्ग मंजुर असल्याचे प्रशासकीय मान्यता असलेले पत्रही उपलब्ध व्हावे. त्यानुसार या कामांचा मी पाठपुरावा करुन मावळच्या विकासात भर घालेन.
सदरहू विस्तृत माहिती मला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आपले मोलाचे असलेले अनुभव आम्हाला ज्ञात असुन ज्या ठिकाणी मला अडचण येईल, त्यावेळी आपले मार्गदर्शन घ्यायला आवडेल. असे आमदार शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.
सदर या पञाची चर्चा मावळ विधानसभेतच नाही तर संपुर्ण महाराष्र्टात रंगली आहे.त्यामुळे सर्वाचे लक्ष माजी आमदार संजय भेगडे काय उत्तर देतात या कडे लागुन आहे.आमदार शेळके हे अभ्यासु व कामात चिकाटी बाळगुन असतात हे पुन्हा पहाण्यास मिळाले.

Previous articleमराठा आरक्षण : उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली नवी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट
Next articleराज्यपालांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान;सुनिल शेट्टी, सोनू निगम, रिचा चड्डा, भारती लव्हेकर सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + fifteen =