देहुरोड,दि.01 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्व राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष असून त्यांच्या ट्रस्टच्यावतीने 3 नोव्हेंबर रोजी देहुरोड कॅन्टोन्मेंटबोर्ड वर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व ऐतिहासिक बुद्ध विहार ट्रस्ट करत आहे.
ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड याठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांच्या विरोधात व संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणी संदर्भात मंगळवार दिनांक 03 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता ऐतिहासिक बुद्ध विहार ट्रस्ट देहूरोड यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड ते कॅन्टोन्मेंट बोर्ड पर्यंत धडक मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाचा मार्ग संपूर्ण देहूरोड बाजार तलाठी ऑफिस मुंबई-पुणे रोड असा असून या मोर्चाचे नेतृत्व देहूरोड बुद्ध विहार ट्रस्ट तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे या मोर्चामध्ये रिपब्लिकन सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सर्व आरपीआयचे गट हे सामील होणार आहेत याकरिता देहूरोड विभागात दिनांक 31 ऑक्टोबर रोजी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस अॅड.अशोक रुपवते,प्रवक्ते सुनिल कडलक,खजिनदार संजय ओव्हाळ,कार्यध्क्ष गुलाब चोपडे यांनी मोर्चाचे नियोजनपर मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे पिं चि.शहरध्यक्ष बापु गायकवाड, रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षा भिमाताई तुळवे,वंचित बहुजन आघाडीचे पि.चि.शहरध्यक्ष देंवेन्र्द तायडे,रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले गट) चे मावळ लोकसभेचे कार्यध्यक्ष दिलीप कडलक व वरीष्ट उपाध्यक्ष सिद्धार्थ चव्हाण तसेच देहुरोड शहराचे अध्यक्ष सुनिल गायकवाड,युवा नेते अप्पु शिवशरण,बुद्धविहार कृतीसमितीचे संस्थापकीय सचिव के.एच.सुर्यवंशी,मधुकर रोकडे,बी.टी.भंडारे,वंचितचे अंकुश कानडी(मा.नगरसेवक),भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संजय आगळे,प्रकाश कांबळे,आरपीआयचे देहुरोड सरचिटणीस राहुल गायकवाड,सम्राटचे पञकार नाना गायकवाड,जागृती न्युजचे भुजबळ,व आदी पञकार व सामाजीक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सदरच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असं आव्हान बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे खजिनदार संजय सोमा ओव्हाळ यांनी केले आहे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की देहूरोड बुद्ध विहार ट्रस्ट यांची स्थावर मालमत्ता 1966 पासून बुद्ध विहार समिती म्हणजेच आताची बुद्ध विहार ट्रस्ट नावे आहे त्यामुळे बुद्ध विहारचा जो ऐतिहासिक जुना हॉल टॅक्सास आणि त्याच्या कृती समितीने पाडला तो ट्रस्ट बांधत असताना वारंवार त्यामध्ये अडथळे निर्माण करून फक्त 25 डिसेंबर रोजी येणाऱ्या जनतेला उपासकांना मीच काम करतो हे भासवण्यासाठी जुना पाडलेला ऐतिहासिक हॉल पाडून पुन्हा बांधून मी बुद्ध विहार बांधले हे लोकांना भासवण्यासाठी हा चाललेला अनधिकृतपणे खेळखंडोबा थांबवण्यासाठी व तसेच अतिक्रमण विभागाचे कॅन्टोन्मेट बोर्डाचे अधिकारी यांच्या संगनमतानेच चाललेल्या कामा विरोधात आपण कॅन्टोन्मेंट बोर्ड वरती हा मोर्चा काढत आहोत.जुन्या लोकांची व प्रशासनाची जी फसवणुक झाली ती आता होऊ द्यायची नाही.समाज आता जागृत आहे आणि ते आता पुढे आल्या शिवाय राहणार नाही.आता ह्या समाजाला विघातक लोकांविरोधात आपण सर्वांनी या मोर्चात सामील व्हावं असे अव्हान देखील करण्यात आले आहे.