Home चंद्रपुर चंद्रपुर- जनता महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न

चंद्रपुर- जनता महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न

138
0

चंद्रपुर,11 सप्टेंबर 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी – प्रा. महेंद्र बेताल, जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर):- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेबंर रोजी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या तर्फे जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जिवतोडे यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.सुभाष उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.आशिष महातळे व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.विनायक बोढाले उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सचिन मिसार, डॉ.पियुष मेश्राम, डॉ.मनिष जिवतोडे ,प्रा. अमर बल्की, डॉ.असलम सुरीया, डॉ.उमाकांत देशमुख,प्रा.पि.व्हि.पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ मिलिंद जांभुळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल श्री.प्रशांत चहारे यांनी मानले.

Previous articleपिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयूक्त पदी आयर्न मॅन कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती
Next articleप्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे निगडीमध्ये ना.बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + 11 =