पुणे,दि.3 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
डाॅ.शितल रणधीर,पुणे (9921015759)यांची अमेरिकेतील वर्ल्ड स्पोर्ट्स मार्शल आर्टस् कौन्सिल (Phd)पीएचडी बोर्ड ऑफ एज्युकेशन वर नियुक्ती करण्यात आली आहे डाॅ.शीतल रणधीर ह्या असिस्टंट प्रोफेसर असून टिकाराम जगन्नाथ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज खडकी पुणे येथे 15 वर्षापासून कार्यरत असून(BBA) बीबीए कॉमर्स डिपार्टमेंट मध्ये विभागप्रमुख म्हणुन कामकाज पाहतात. या नियुक्तीवर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून डाॅ.शीतल रणधीर या आंबेडकर चळवळीतील युवा तरुण महिला कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत अनेक चळवळीतील कामात ते अग्रगण्य असतात त्या मुळच्या वरवंड तालुका-दौंड जिल्हा-पुणे येथील असून सध्या वास्तव्यास विश्रांतवाडी पुणे येथे आहेत त्यांचे पती महाराष्ट्र पोलीस दलात सेवेमध्ये कार्यरत आहेत या नियुक्तीवर त्यांच्या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असून चळवळीतील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे
Congratulations Sheetal, proud of you.
Congratulations Sheetal mam you deserve that recognition….✌️
शीतल, तुझं मनापासून अभिनंदन ! डॉ हेमंत देवस्थळी