Home ताज्या बातम्या गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांकडून येशू ख्रिस्ताचे स्मरण

गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांकडून येशू ख्रिस्ताचे स्मरण

0

नवी दिल्ली,10 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त सत्य, सेवा आणि न्यायाप्रति येशू ख्रिस्ताच्या वचनबद्धतेचे स्मरण केले.

“प्रभु ख्रिस्ताने आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांचे धैर्य, नितीमत्ता आणि न्यायभावना अनन्यसाधारण आहे. गुड फ्रायडे निमित्त मी प्रभु ख्रिस्ताचे तसेच सत्य, सेवा आणि न्यायाप्रति त्यांच्या बांधिलकीचे स्मरण करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =