Home ताज्या बातम्या आमदार सुनील शेळकेंच्या जनसंपर्क कार्यालयास राज्यमंत्री आदिती तटकरेंची सदिच्छा भेट

आमदार सुनील शेळकेंच्या जनसंपर्क कार्यालयास राज्यमंत्री आदिती तटकरेंची सदिच्छा भेट

0

तळेगाव दाभाडे, दि.१५ फेब्रुवारी २०२० (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयास पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. मावळ तालुक्यातील पर्यटनाला अधिकाधिक चालना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी आमदार शेळके यांच्या सुविद्य पत्नी सारिकाताई शेळके यांनी राज्यमंत्री तटकरे यांचे औक्षण करुन स्वागत केले आणि विठ्ठल – रुक्मिणी मुर्ती भेट दिली. यावेळी जि.प.सदस्य शोभाताई कदम, तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगिता शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सुनिता काळोखे, मा.नगरसेविका माया भेगडे यांच्यासह मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आदिती तटकरे या हृद्य भेटीने सर्व उपस्थित महिला भारावून गेल्या होत्या.आमदार सुनिल शेळके यांच्याशी तटकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मावळच्या पर्यटनाचा विषय त्यांनी यावेळी आग्रहाने मांडला. शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक किल्ले असून त्यांचा विकास आणि संवर्धन केल्यास तालुक्यातील विकासाला चालना मिळेल, असे सांगितले. तसेच मावळ तालुक्तील क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मावळ तालुक्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करून किल्यावर विविध विकासकामे करून पर्यटनाला चालना दिली जाईल तसेच क्रीडा क्षेत्राशी निगडीत सर्व विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासनही तटकरे यांनी यावेळी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 18 =

error: Content is protected !!
Exit mobile version